नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे पुढील महिन्यात भारत दौऱ्यावर येण्याचा विचार करत आहेत. तीन वर्षापुर्वी त्यांनी पदभार स्वीकारल्यापसून ही त्यांची पहिलीच भारत भेट असेल, असे या घटनेशी सबंधीत सुत्रांनी सांगितले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला आहे. त्याचाच भाग म्हणून मोदी यांना प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहण्यासाठी भारतभेटीचे ट्रम्प यांना निमंत्रण या पुर्वीच दिले होते. मात्र, अमेरिकेच्या राष्ट्रीय अभिभाषणाचा दिवस आणि प्रजासत्ताक दिनाची तारीख एकच येत असल्याचे अमेरिकन प्रशासनाने कळवले आहे.
ट्रम्प यांच्या भारत भेटीसाठी दोन्ही बाजू उत्सुक असून तारीख निश्चित करण्यासाठी दोन्ही बाजून प्रयत्न सुरू आहेत, असे या सुत्रांनी सांगितले जात आहे. राजधानी दिल्लीसह अन्य एखाद्या शहराला ट्रम्प भेट देतील, ही भेट फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात होईल, असे सूत्रांनी सांगितले आहे.
या भेटीबाबत भारताच्या परराष्ट्र खात्याने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. भारत आणि अमेरिकेत राजकीय आणि सुरक्षा संबंधांबाबत निकटता आहे. मात्र गेल्या काही वर्षात व्यापार क्षेत्रातील संबंधांबाबत तणाव निर्माण झाला आहे. भारताचे नाव घेऊन ट्रम्प यांनी अनेकदा भारताच्या व्यापारविषयक धोरणावर टीका केली आहे. त्यांनी भारताला महत्वाचा व्यापारी भागीदार म्हणून मिळणाऱ्या सवलतीही रद्द केल्या आहेत.