न्यूयॉर्क : अमेरिकेचा प्रसिद्ध बास्केटबॉलपटू आणि एनबीए स्टार कोबी ब्रायंट याचा त्याच्या १३ वर्षीय मुलीसह हेलिकॉप्टर दुर्घटनेत मृत्यू झाला असल्याची माहिती समोर येत आहे. याबाबत अधिकृत माहिती समोर आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कॅलिफोर्नियातील कॅलाबसेस येथे ही हेलिकॉप्टर दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत कोबी ब्रायंटसह अन्य तीन जणांचा मृत्यू झाला आहे. कोब हा मांबा अकादमीमध्ये सरावासाठी जात असताना ही दुर्घटना घडली. कोबी याच्यामागे पत्नी व नतालिया, बियांका आणि कापरी या अन्य तीन मुली आहेत. कोबी हा लॉस एन्जल्स लेकर्स या टीमकडून एनबीएमध्ये खेळत होता. त्याच्या जाण्याने अमेरिका बास्केटबॉल विश्वावर शोककळा पसरली आहे.
कोबीसोबत दुर्घटनेत मृत्यू झालेली त्याची तेरी वर्षाची मुलगी जिएन्ना ब्रायंट हिची बास्केटबॉल खेळाडू होण्याची इच्छा होती. कोबीच्या प्रत्येक सामन्यांना ती हजेरी लावत असे. कोबी तीला बास्केटबॉलचे धडे देत असतानाचा त्यांचा २०१९ मधील एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. हेलिकॉप्टर दुर्घटनेचे कारण अद्याप समजू शकलेले.












































