मुंबई: इराकमधील बगदाद विमानतळावर अमेरिकेच्या हल्ल्यामुळे जगभरातील शेअर बाजारात खळबळ उडाली आहे. शुक्रवारी भारतीय शेअर बाजार कोसळला आणि बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (बीएसई) सेन्सेक्स ११९ अंकांच्या घसरणीसह सुरू झाला. नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा (एनएसई) निफ्टीही २१ अंकांनी खाली १२,२६१.१० वर खुला झाला.
कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ बगदादमधील हल्ला आणि त्यात इराणी जनरलच्या मृत्यूमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाची किंमत ४ टक्क्यांनी मजबूत झाली. यामुळे तेल विपणन कंपन्यांवर दबाव आणला गेला आहे. जपानच्या निक्की २२५ मध्येही घसरण बघण्यास मिळाली आहे.
रुपया मध्ये घसरण शुक्रवारी रुपयाही घसरण्यास सुरुवात झाली. डॉलरच्या तुलनेत रुपया १२ पैशांनी घसरून ७१.४९ वर उघडला. सेन्सेक्सच्या जवळपास ४१७ समभागांमध्ये वाढ व ४३५ समभागात घसरण दिसून आली. वाढत्या मोठ्या समभागात गेल, ओएनजीसी, टीसीएस, इन्फोसिस, एचसीएल टेक इत्यादी प्रमुख कंपन्यांचा समावेश आहे तर जी एंटरटेनमेंट, बीपीसीएल, वेदांत, एशियन पेंट्स, टाटा मोटर्स आणि एसबीआय यांचा समावेश आहे. आयटी व्यतिरिक्त सर्व क्षेत्रात घट आहे.