अमेरिकेच्या बगदादामधील दूतावासात बंडखोर शिरले

इराक (वृत्तसंस्था) : इराक आणि सिरीयामध्ये रविवारी अमेरिकेने केलेल्या हवाई हल्ल्याच्या पार्श्‍वभूमीवर इराकी शित्ते मिलिशियाचे शेकडो समर्थक येथील अमेरिकन दुतावासात मंगळवारी(दि.३१)डिसेंबर रोजी घुसले. या संतप्त निदर्शकांनी दुतावासाचे दारत तोडून संस्थेच्या आवारावर ताबा मिळवला.

याबाबत ” रायटर” या वृत्त संस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, या जमावाला पांगवण्यासाठी अमेरिकन सुरक्षा रक्षकांनी हात बॉम्बचा वापर केला. यावेळी शेकडो निदर्शक अमेरिकन दुतावासाच्या आवारात घुसले असल्याची माहिती मिळाली. त्यांनी दार फोडून संस्थेच्या आवारात प्रवेश केला. त्यांनी स्वागत कक्ष पेटवला. अश्रुधुराच्या नळकांड्या फोडून गोळीबार केला असल्याची माहिती मिळाली आहे.असेही रायटर ने म्हटले आहे.

यावेळी दुतावासाच्या पार्किंगमधून आगीचे लोट दिसत होते. मात्र त्यात किती नुकसान झाले आहे याचा तपशील समजू शकला नाही. परंतु संस्थेच्या आवारात प्रवेश करू नका, असे एक माणूस ओरडत होता. त्याने शेवटी आम्ही संदेश दिला आहे, असेही म्हटले. दुतावासावर केलेला हा अलीकडच्या काळातील सर्वात भीषण हल्ला होता.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा