अमित शहा करत आहे ‘आप’ नेत्यांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न, पक्षानं केला दावा

नवी दिल्ली, १४ डिसेंबर २०२०: काल पुन्हा एकदा दिल्ली पोलिस आणि आम आदमी पार्टीमधील संघर्ष पाहायला मिळाला. गृहमंत्री अमित शहा यांच्या घराबाहेर निषेध करण्यासाठी निघालेल्या आम आदमी पक्षाच्या अनेक आमदारांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. शनिवारी दिल्ली पोलिसांनी आपच्या आमदारांना गृहमंत्री अमित शहा यांच्या घराबाहेर निषेध करण्याची परवानगी नाकारली.

आम आदमी पक्षानं एका ट्विटमध्ये दावा केला आहे की, दिल्ली पोलिसांनी आमदार ऋतुराज, राघव चड्ढा, कुलदीप कुमार आणि संजीव यांना अटक केली आहे. मात्र, दिल्ली पोलिसांचं म्हणणं आहे की, या आमदारांना ताब्यात घेण्यात आलं आहे. कारण हे आमदार परवानगीशिवाय गृहमंत्री अमित शहा यांच्या घराबाहेर निषेध करणार होते.

आम आदमी पक्षानं ट्विट केलं आहे की, ते भाजपच्या नेतृत्वाखालील दिल्लीतील महानगरपालिकांमध्ये २४५७ कोटींच्या घोटाळ्याचा निषेध करणार आहेत.

गृहमंत्री अमित शहा यांच्यावर आम आदमी पक्षानं कठोर शब्दांत टीका केली की, गृहमंत्री आणि त्यांच्या पोलिसांनी त्यांना तुरूंगात टाकलं तरी त्यांचा आवाज दडपला जाऊ शकत नाही.

आम आदमी पक्षानं असा दावा केला आहे की, गृहमंत्री अमित शहा त्यांच्या आमदारांना आवाज उठवू देत नाहीत. ग्रेटरचे आपचे आमदार कैलाश सौरभ भारद्वाज यांनी दिल्ली पोलिसांनी आमदार ऋतुराज यांना अटक केल्याचा आरोप केला आहे. आज त्यांना एलजी अनिल बैजल यांना भेटायला जायचं होतं. सौरभ भारद्वाज म्हणाले आहेत की गृहमंत्री अमित शहा कोणालाही आवाज उठवू देत नाहीत.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा