मुंबई, ५ सप्टेंबर २०२२: केंद्रीय मंत्री अमित शाह आज मुंबई दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात त्यांनी लालबागच्या राजाचे दर्शन घेतले. आशिष शेलार यांच्या घरच्या गणपतीचे दर्शन घेतले. हे सगळं औपचारिक आहे. पण behind the curtain नक्की काय आहे. हे मात्र कुणालाच माहित नाही.
उद्धव ठाकरे यांच्यापासून शिंदे गट वेगळा झाला खरा. पण यामागे देवेंद्र फडणवीस यांचा हात असल्याची वार्ता होती. पण ही गणित वरपासून बदललेली होती. याचाच प्रत्यय यायला सुरुवात झाला. अमित शाह यांनी मुंबईत पाऊल ठेवल्याने आता भाजपच्या हालचालींना वेग आला आहे. अमित शाह यांचा दौरा हा सर्व पक्षाच्या दृष्टीने मह्त्त्वाचा मानला जात आहे. याचे कारण एकच मुंबई महापालिका. सध्या मुंबई महानगरपालिका ही शिवसेनेच्या म्हणजेच उद्धव ठाकरेंच्या गटाकडे आहे. पण शिंदे- फडणवीस गटाचे आता मुंबई महापालिका मिळवणे, हेच ध्येय आहे. ज्यासाठी आता अमित शाह यांनी मध्यस्थी केली आहे. तर उद्धव ठाकरे यांच्यासाठी ही पालिका निवडणूक जिंकणे हे अतिशय गरजेचे आहे.
अमित शाह यांनी भाजपच्या मिटींगमध्ये महापालिकेसाठी मिशन १५० ठरवलं आहे. यावेळी त्यांनी भाजपची कोअर मिटींग घेतली. त्यात त्यांनी शिवसेनेवर हल्ला बोल केला आहे. शिवसेनेने खयाली पुलाव पकवल्याने त्यांची ही अवस्था झाली आहे.. उद्धव ठाकरेंनी केवळ दोन जागांसाठी युती तोडली आणि आपल्याला धोका दिला आहे. त्यांना त्यांची जागा दाखवा. असे परखड मत अमित शाह यांनी व्यक्त केले. यंदा महापालिकेवर भाजपचा झेंडा फडकवा, असेही अमित शाह यांनी सांगितले. त्यामुळे अमित शाह यांचा दौरा केवळ फटकेबाजीनं गाजला असं म्हणावं लागेंल.
त्यामुळे आता मुंबई महापालिकेवर भाजपचा झेंडा फडकणार की शिवसेनेचा भगवा फडकणार, हे मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुका झाल्यानंतरच समजेल.
न्यूज अनकट प्रतिनिधी- तृप्ती पारसनीस