अमित शहा यांचा नाशिक दौरा रद्द, नेमकं काय आहे कारण

नाशिक, 20 जून 2022: नाशिकमधून एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे राष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने 21 जूनला नाशिक दौर्‍यावर येणार होते पण त्यांचा हा दौरा रद्द करण्यात आलाय. अमित शहा यांच्या ऐवजी केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राँय नियोजित कार्यक्रमांना हजेरी लावणार आहेत. विशेष म्हणजे अमित शहा यांच्या दोन दिवसीय कायक्रमांचं नियोजन पूर्ण झालेलं होतं पण तसं आसताना अचानक त्यांचा दौरा रद्द करण्यात आलाय. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अग्निपथ योजनेवरुन देशात वातावरण तापल्यान त्यांचा दौरा रद्द झाला.

केंद्र सरकारने सैन्य भरतीसाठी अग्निपथ योजनेची घोषणा केली आहे. या घोषणेनुसार केंद्र सरकार तरूणांना चार वर्षे भारतीय सैन्यात काम करण्याची संधी देणार आहे. पण केंद्र सरकारच्या योजनेला देशभरात प्रचंड विरोध करताना विद्यार्थ्यांनी कायदा हातात घेतल्याचं बघायला मिळतंय.

काही ठिकाणी तर रेल्वे जाळण्यात आल्या आहेत.केंद्र सरकारच्या विरोधात या योजनेवरून रोष दिवसोदिवस वाढताना दिसत आहे. पण, केंद्र सरकारने तरीही ही योजना मागं घेणार नसल्याचं म्हटलंय. दरम्यान अग्निवीरांना सवलत देण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारसह हवाई दल देखील सरसावलं आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी:

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा