गोल पोस्ट राजकारण साताऱ्यातील कोरेगाव येथे मनसे केसरी बैलगाडा शर्यतीसाठी अमित ठाकरे यांची उपस्थिती, ठाकरेंना...

साताऱ्यातील कोरेगाव येथे मनसे केसरी बैलगाडा शर्यतीसाठी अमित ठाकरे यांची उपस्थिती, ठाकरेंना चर्चेत असणाऱ्या बकासुर बैलाची भुरळ

कोरेगाव, सातारा ११ डिसेंबर २०२३ : मनसे विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे हे आज साताऱ्यातील कोरेगाव येथे आयोजित केलेल्या मनसे केसरी बैलगाडा शर्यतीसाठी उपस्थित राहिले. यावेळी त्यांचे जंगी स्वागत झाल्यानंतर मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांना बैलगाडी मध्ये बसण्याची विनंती केली, मात्र अमित ठाकरे स्वतःहा बैलगाडी सोबत जोडलेल्या बैलांच्या बरोबर चालत स्टेजपर्यंत आले आणि दोन्ही बैलांना स्वतःचे मस्तक लावून नमन केले. यावेळी बैलाविषयी असणारा त्यांचा आदर पाहायला मिळाला.

या आयोजित केलेल्या बैलगाडा शर्यतीसाठी जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातून मोठ्या संख्येने बैलगाडी स्पर्धकांनी आणि शौकिनांनी आपली उपस्थिती लावली होती. दरम्यान सध्या राज्यभरात बैलगाडा शर्यती मध्ये चर्चेत असणारा बकासुर बैलाला पाहण्यासाठी अमित ठाकरे हे आवर्जून स्टेजवरून खाली आले आणि त्याच्या मालकासोबत बैलाच्या आरोग्याची विचारपूस केली तसेच पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

आज घेतलेल्या मनसे केसरी बैलगाडा शर्यतीच्या निमित्ताने प्रसिद्ध माध्यमांना प्रतिक्रिया देत असताना अचानक सूत्रसंचालकाने बोलण्यास सुरुवात केली असता, त्यांनी आपली प्रतिक्रिया मध्येच थांबवत या ठिकाणी संजय राऊत आलेत का? असे म्हणत राऊतांची खिल्ली उडवली.

न्युज अनकट प्रतिनिधी : ओंकार सोनावले

error: Content is protected !!
Exit mobile version