मुंबई:२९ जूलै २०२२: राज्यातल्या तरुणाईला आकर्षित करण्यासाठी मनसे नेते अमित ठाकरे यांनी कंबर कसली आहे. महाराष्ट्र नवनिर्मान विधार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांनी तरुणाईला आठवड्याभरात मनसे विधार्थी सेनेचे १०० युनिट स्थापन करणार असल्याची घोषणा केली आहे.
पहिल्या टप्यात ६६ युनिट स्थापन करणार असून मुंबईतील विविध महाविद्यालयात हे युनिट स्थापन करण्यात येणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार अमित ठाकरे स्वतः १ ऑगस्ट आणि २ ऑगस्टला या युनिटचे उदघाटन करणार आहेत. राज्यभरात ५०० युनिट स्थापन करुन महाराष्ट्र नवनिर्मान विधार्थी सेना तरुणांचा मोठा वर्ग आपल्याकडे करुन ‘अमितछाप’ सोडण्याचा प्रयत्न करणार आहे.
राज्याच्या राजकारणात सक्रिय होऊ पाहणारे राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरे हे सध्या संघटनात्मक बांधनीवर जास्त लक्षं देतायत. त्यासाठी ते राज्यातील अनेक भागात फिरतायत. राज्यातील सध्याच्या राजकीय परिस्थितीचा फायदा पक्षाला कसा होऊ शकेल यावर लक्ष केंद्रीत करत तरुण मतदारांना आकर्षित करण्यासाठी मनसेचा गनिमीकावा सुरु आहे. राज ठाकरेंची प्रकृती आता ठिक असून तेही पक्षाच्या कार्यक्रमांत सक्रिय होत आहेत.
न्युज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर