रंगभूमीच्या सेवेसाठी अमोल बावडेकर यांची डॉक्टरांना विनंती; म्हणाले मला फक्त…

Amol Bavdekar Health Update After Heart Attack
अमोल बावडेकर यांची डॉक्टरांना विनंती;

Amol Bavdekar Health Update After Heart Attack: पु. ल. देशपांडे यांची अजरामर कलाकृती अर्थात
‘सुंदर मी होणार’ हे नाटकं. १२ जुन ला या नाटकाचं रंगभूमीवर पुन्हा एकदा पुनरागमन झालं. या नाटकाचे २ प्रयोग झाल्यानंतर तिसरा प्रयोग वाशीत होता. ह्याच प्रयोगाच्या वेळेस अभिनेते अमोल बावडेकर जे ह्या नाटकात सुरेश ही व्यक्तिरेखा साकारत आहेत. त्यांना वाशीच्या प्रयोगावेळेस काहीसे अस्वस्थ वाटल्यासारखे झाले. तरीही त्यांनी प्रयोग केला. पण त्याच्या दुसऱ्याच दिवशी अमोल बावडेकर यांना हृदयविकाराचा झटका आला. आणि त्यांना रुग्णालयात तातडीने दाखल करण्यात आले.

नेमकं झालं काय?

हृदयविकाराचा झटका बसल्यामुळे ‘ सुंदर मी होणार’ या नाटकाचा प्रयोग रविवारी सकाळी रद्द करावा लागला. मुंबईतील विलेपार्ले येथील दीनानाथ नाट्यगृहात हा प्रयोग होणार होता. बावडेकर यांच्यावर अँजिओग्राफी करण्यात आली असून त्यांची प्रकृती आता स्थिर आहे. मात्र प्रकृती ठीक नसतानाही प्रयोग करु देण्याची बावडेकर यांची विनंती रंगभूमीची सेवा करण्याची कलाकारांची विजिगीषू वृत्ती अधोरेखित करते.त्यांच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आली. अँजिओप्लास्टीनंतर आता अमोल बावडेकर यांची तब्येत कशी आहे याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. त्यांचे जवळचे मित्र आणि प्रसिद्ध अभिनेते प्रशांत चौडप्पा यांनी हॉस्पिटलमधून अभिनेत्याची हेल्थ अपडेट दिली आहे.

अमोल यांच्या प्रकृतीबद्दल कळल्यानंतर नाटकाच्या निर्मात्यांनी रविवारी सकाळी पावणेअकरा वाजता पार्ल्यातील दीनानाथ नाट्यगृहामध्ये होणारा प्रयोग रद्द करण्याचा निर्णय घेतला. प्रेक्षकांना नाटकाच्या तिकिटाचे पैसे परत करण्यात आले. अमोल यांच्या जागी आता अभिनेता अनिरुद्ध जोशी ही भूमिका साकारणार आहे. लवकरच तालमी करून नाटकाच्या पुढच्या प्रयोगात तो दिसेल, अशी माहिती दिग्दर्शक राजेश देशपांडे यांनी दिली.

न्यूज अनकट प्रतिनिधी; इंदिरा तेंडोलकर