गोल पोस्ट महाराष्ट्र मुंबई मुंबईतील ३२ वर्षीय सह पोलीस निरीक्षक अमोल कुलकर्णी यांचा कोरोनामुळे मृत्यू

मुंबईतील ३२ वर्षीय सह पोलीस निरीक्षक अमोल कुलकर्णी यांचा कोरोनामुळे मृत्यू

मुंबई, दि. १६ मे २०२०: आज १६ मे रोजी शाहूनगर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल कुलकर्णी यांचे दुःखद निधन झाले आहे. ते कोविड पॉझिटिव्ह असल्याचं आजच्या अहवालात कळाले आहे. अमोल हे ३२ वर्षाचे होते. अमोल कुलकर्णी हे ताप आणि सर्दी मुळे आजारी होते तीन दिवसांपूर्वी त्यांनी तपासणी करून घेतली होती ज्याचा रिपोर्ट आज पॉझिटिव्ह आला आहे.

अतुल कुलकर्णी गेल्या दोन ते तीन दिवसांपासून आजारी होते. त्यांनी यासंदर्भात कोरोना चाचणी देखील केले होती. परंतू या चाचणीचा अहवाल येण्याआधीच त्यांचा मृत्यू झाला. १३ मे रोजी त्यांनी सायन रुग्णालयात आपली चाचणी करून घेतली होती. आज सकाळी पहाटे पाच वाजता राहत्या घरी आंघोळ करत असताना ते बेशुद्ध अवस्थेत सापडले. त्यानंतर त्यांना सायन रुग्णालयात नेण्यात आले. मात्र तेथे दाखल केल्यावर त्यांना मृत घोषित करण्यात आलं.

आतापर्यंत केवळ मुंबईमध्ये कोरोनामुळे ९ पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. त्यातही सर्वात जास्त बाधित पोलीस कर्मचारी हे मुंबईमध्येच आहेत. मुंबईत आत्तापर्यंत ४७० पोलीस कर्मचाऱ्यांना या विषाणूची लागण झाली आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी

error: Content is protected !!
Exit mobile version