पुरंदर, १८ डिसेंबर २०२०: रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकरवादी या पक्षाच्या पुणे जिल्हा युवक उपाध्यक्षपदी निरा येथील सामाजिक कार्यकर्ते अमोल साबळे यांची निवड करण्यात आली आहे. या निवडक बाबतचं पत्र पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक निकाळजे यांनी दिलं आहे.
नीरा येथे विविध सामाजिक कार्यामध्ये सहभाग असणारे, जनतेचे प्रश्न समस्या शासन दरबारी मांडण्यासाठी पुढाकार घेणारे सामाजिक कार्यकर्ते अमोल साबळे यांची आंबेडकरवादी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड झाल्यानं नीरा आणि परिसरातून त्यांचं अभिनंदन करण्यात येत आहे. आज येथील विविध पक्षांच्या कार्यकर्त्यांनी तसंच प्रतिष्ठित व्यक्तींनी अमोल साबळे यांचं या निवडीबद्दल गुलाब पुष्प व पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केलं व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. निरेतिल उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते भैयासाहेब खाटपे, राष्ट्रवादी काँग्रेसचे निरा शहर अध्यक्ष प्रमोद काकडे, पुरंदर तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष रहुल शिंदे, भाजपचे विस्तरक अण्णासाहेब माने, नदिम सय्यद, अजय राऊत, पत्रकार भरत निगडे, संजय भंडारी यांनी अमोल साबळे यांचं या निवडी बाबत अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी बोलताना साबळे म्हणाले की, पक्षानं दिलेली जबाबदरी पारपडण्यासाठी मी प्रयत्न करेन. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शिवाजी महाराज यांनी दिलेला समतेचा व एकात्मतेचा विचार घेऊन मी काम करणार आहे. समाजातील कोणत्याही स्थरातील लोकांवर अन्याय होणार नाही, यासाठी मी काम करणार आहे. पक्षानं दिलेल्या सर्व जबाब दाऱ्या पार पाडून जिल्ह्यात पक्ष वाढीसाठी प्रयत्न करणार आहे.
न्युज अनकट प्रतिनिधी: राहुल शिंदे