बंगालमध्ये अम्फान वादळामुळे ७२ लोकांचा मृत्यू

4

कोलकत्ता, दि. २१ मे २०२०: चक्रीवादळामुळे पश्चिम बंगाल आणि ओडिशामध्ये मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. ताशी १६० ते १८० किलोमीटर वेगाने वारे वाहत होते त्यामुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली आहेत तर काही ठिकाणी विद्युत खांब पडले आहेत. इतकेच काय तर कोलकत्ता मध्ये विमानतळ पूर्ण उध्वस्त झाले आहे. सर्व भागांमध्ये पाणी साठलेले आहे. मोठ्या प्रमाणावर वित्त हानी झाली आहेत. परंतु ममता बॅनर्जी यांचे असे म्हणणे आहे की केवळ वित्तहानी नाहीतर या चक्रीवादळामुळे ७२ लोकांचा जीव देखील गेला आहे. ममता बॅनर्जी यांनी नरेंद्र मोदी यांना राज्याचा दौरा करण्याचा देखील सल्ला दिला आहे.

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी असे सांगितले की, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी राज्यात भेट द्यावी. अजूनही येथील परिस्थिती आपत्कालीन असल्याचे त्यांनी सांगितले. मी देखील लवकरात लवकर येथील परिस्थिती पुन्हा पूर्वीसारखी होईल याची वाट बघत आहे. या चक्रीवादळामुळे मृत झालेल्या व्यक्तींसाठी ममता बॅनर्जी यांनी प्रत्येकी दोन लाख अशी मदत जाहीर केली आहे.

देशात लॉकडाऊनमुळे आधीच अर्थव्यवस्था खालावली आहे त्यात हे संकट ओढवल्या मुळे आणखीन आर्थिक हानी झाली आहे. केवळ आर्थिकच नव्हे तर जीवित हनी देखील झाली आहे. पश्चिम बंगालमध्ये या वादळामुळे ७२ लोकांचा मृत्यू झाला आहे. ममता बॅनर्जी यांच्या म्हणण्यानुसार कोलकातामध्ये १५ हावडामध्ये ७, उत्तर २४ परगणामध्ये १७, पूर्व मिदनापूरमध्ये ६, दक्षिण २४ परगनामध्ये १८, नादियामध्ये  ६ आणि हूग्लीमध्ये २ लोकांचा मृत्यू झाला आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा