गोल पोस्ट महाराष्ट्र अमरावतीत दहा जणांविरोधात बलात्काराचा गुन्हा

अमरावतीत दहा जणांविरोधात बलात्काराचा गुन्हा

अमरावती : हैदराबादमध्ये एका डॉक्टर तरुणीवर बलात्कार करून तिची जाळून हत्या करण्यात आली. या घटनेनंतर संपूर्ण देशभरात निषेध नोंदवला जात आहे. परंतु अमरावतीतूनही अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

अंजनगाव सुर्जी पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका ४५ वर्षीय महिलेसह तिच्या २१ वर्षीय मुलीवर दहा जणांनी ऑक्‍टोबर रोजी रात्री दहा ते साडे अकराच्या सुमारास सामूहिक अत्याचार केल्याची घटना घडली असल्याचे या तक्रारीत सांगण्यात आले आहे. अंजनगाव सुर्जी पोलिसांनी रविवारी (दि. १५) दहा जणांविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, या घटनेतील नऊ आरोपी हे रवी ढेंगे यांच्या घरी जेवण करण्यासाठी १० च्या सुमारास आमच्या घरात शिरले. यावेळी दहाही आरोपींनी आपल्यासह आपल्या आईला शिवीगाळ करून शरीरसुखाची मागणी केली होती. आणि दोघींवरही शारीरिक अत्याचार केला. त्याच वेळी पीडितांचा भाऊ घरी आला. त्या वेळी आरोपींनी त्याला मारहाण केली.
या घटनेत, आरोपीमध्ये गुड्ड्या इंगळे, बुटक्या इंगळे, नितीन धन, आशिष ढेंगे, रवी ढेंगे, बाळासाहेब गायगोले, नानासाहेब गायगोले, सुधीर बोरखडे, सर्व राहणार शहापूर अंजनगाव सुर्जी, यांच्यासह एक पंचवीस वर्षाच्या मुलाचेही नाव आहे.

अखेर पीडितेने व तिच्या आईने अमरावती येथे पोलीस निरीक्षक त्यांच्याकडे तक्रार दाखल करुन आरोपींवर त्वरित कारवाई करण्याची मागणी केली होती. पीडितेच्या या तक्रारीवरून वरिष्ठांच्या आदेशानुसार अंजनगाव पोलिसात दहाही आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

error: Content is protected !!
Exit mobile version