अमरावती जिल्ह्यातील मोहम्मद खान महाराजांचा पालखी सोहळा रद्द

अमरावती, दि.२७ मे २०२०: अमरावती जिल्ह्यातील भातकुली तालुक्यात संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध हिंदु-मुस्लिम ऐक्याचे प्रतिक असलेले गाव गणोरी इथून दरवर्षी आषाढीला संत मोहम्मद महाराज खान महाराजांची पालखी पंढरपूरला जाते. यंदाचे १४ वर्ष होते .इथून पालखी सोहळा जवळपास एक महिना पायी प्रवास करून श्री संत गाडगेबाबा धर्मशाळा पंढरपूर येथे पोहोचतो. पालखी सोहळ्यात नांदुरा बुद्रुक, अमरावती, हनवतखेडा , येथील जवळपास शंभर भजनी मंडळ व वारकरी तसेच दिंडीत नामवंत कीर्तनकार व प्रवचनकार सहभागी होत असतात.

परंतु यावर्षी कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर दिंडी चालक हरिभक्त परायण अनिल महाराज देशमुख यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सांगितले की, यावर्षी पालखी सोहळा रद्द करण्यात आला आहे. परंतु सोहळ्यात खंड पडून नको म्हणून नऊ दिवसाचा पूजाविधी पंढरपूर येथे पार पडल्या जायचा तो गणोरी गावातील श्री संत मोहम्मद खान महाराजांच्या मंदिरात पार पाडला जाईल.

सोबतच गणोरी गावातील श्री संत मोहम्मद खान महाराज व श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर येथे शासनाच्या आदेशाचे ,पालन करून पंढरपूर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिर व गणोरी येथील मोहम्मद खान महाराजांचा संत भेट आषाढी वारी निमित्त केल्या जाईल. असेही त्यांनी सांगितले आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी:

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा