सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात अमृता फडणवीसांची उडी, तर पक्षाची सारवासरव…….

मुंबई, ४ ऑगस्ट २०२० : सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येनंतर वाद आणि राजकारण चालूच आहे. या प्रकरणाला आता रजकीय रंग चढताना दिसतोय त्यात बिहार विरुद्ध महाराष्ट्र असं चित्र या आत्महत्यावरुन उभ केलं जात असून यामधे अनेक सिनेकलाकारांबरोबर काही राजकारणी नेते मंडळी देखील आपली मते व्यक्त करत आहेत.

आता या वादात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता यांनी आपली प्रतिक्रीया दिली आहे. त्यांनी आपली प्रतिक्रिया ट्विटर वर दिली. ज्यामधे त्या म्हणाल्या की “सुशांतच्या हत्येवर सुरु असलेला बातम्या, तपास हे सगळं पाहता मुंबईतील माणुसकी हरवली आहे. मुंबईत आता स्वाभिमानी लोकाचं जगणं सध्या सुरक्षित नाही” असेही त्यांनी म्हटलं आहे. ज्यामुळे राजकीय वातावरणात चांगलीच ठिणगी पडली आहे.

वरुण सरदेसाईंचा पलटवार…..

अमृता फडणवीस यांच्या ट्विटवर वरुण सरदेसाई यांनी पलटवार करत त्यांच्यावर निशाणा साधला आहे. “मॅडम तुम्ही आणि तुमचे कुटुंबीय याच मुंबई पोलिसांची सेक्युरीटी घेऊन राहता आणि यांच्यावरच नीच आरोप करता?” असे ट्विट केले आहे. तर त्यांनी अजून एक ट्विट करत याच “मुंबई पोलिसांच्या उमंग कार्यक्रमात नाचलात गायलात किती कृतघ्न होणार???” असे एकापाठोपाठ एक दोन ट्विट केले आहे.

पटना एस पी क्वांरनटाईन प्रकरण….

या ट्विटर वाॅर आधी पटना मधून एस पी विनय तिवारी हे सुशांत सिंह राजपूत आत्महत्ये प्रकरणाची चौकशी साठी आले असता त्यांना महाराष्ट्रात क्वारंन्टाईन केले. या प्रकरणी महाराष्ट्रातील विरोधी नेत्यांनी सरकारवर टिकेचा सुर छेडला आणि पुन्हा एकदा वाद उफळला.त्या बरोबरच महाराष्ट्र पोलिसांवर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले. मात्र पत्रकार परिषेदमधे आयुक्तांनी एस पी विनय तिवारी यांना क्वारंन्टाईन करण्याचा आणि पोलिसांचा काय संबध? असा त्यांनीच उलट प्रश्न उपस्थित केला.

या सर्व प्रकारावर भाजपचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस तसेच भाजपाच्या काही आमदारांनी अमृता फडणवीस यांची पाठराखण केली तर सरकार मधील नेते हे त्यांच्यावर चांगलंच घणाघणाती टिका करत आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा