केरळच्या ११ वर्षांच्या मुलीने विकसित केले डोळ्यांचे आजार ओळखणारे AI अॅप

केरळ, २८ मार्च २०२३: केरळमधील लीना रफीक या ११ वर्षीय मुलीने आयफोन वापरून एका अनोख्या स्कॅनिंग पद्धतीद्वारे डोळ्यांचे आजार ओळखण्यासाठी एक कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) वर आधारित अॅप्लिकेशन तयार केलंय. लीना रफीक हीने या ऍप्लिकेशनला ‘ओग्लर आयस्कॅन’ असं नाव दिलं आणि वयाच्या १० व्या वर्षी ते विकसित केलंय. तिनं सांगीतलं की, “हे अॅप स्विफ्टयूआयसह कोणत्याही थर्ड पार्टी शिवाय विकसित केलं गेलंय आणि हे अॅप विकसित करण्यासाठी मला सहा महिने संशोधन आणि विकासाचा कालावधी लागला.”

व्हिडिओ प्रात्यक्षिकासह हे अ‌ॅप कसं कार्य करतं हे सांगण्यासाठी तीनं लिंक्डइनचा वापर केला. तिनं सांगीतलं की तीचं अॅप सध्या ऍपलच्या अॅप स्टोअरमध्ये चाचणीसाठी आहे आणि तिची आशा आहे की ते लवकरच मंजूर होईल. तिनं बनवलेल्या अॅप चा ७० टक्के ॲक्युरसी रेट आहे.

तिच्या अॅपच्या कार्याचं प्रात्यक्षिक दाखवणारा एक व्हिडिओ तिनं पोस्ट केला आणि त्यात सांगीतलं की ऑग्लर आयस्कॅन प्रशिक्षित मॉडेल्सच्या मदतीने आर्कस, मेलानोमा, पेटरीजियम आणि मोतीबिंदू सारख्या परिस्थिती ओळखतो. ११ वर्षांच्या चिमुरडीच्या अशा प्रभावी शोधामुळं अनेक नेटिझन्स आश्चर्यचकित झाले आणि त्यांनी तिचं अभिनंदन केलं.

न्यूज अनकट प्रतिनीधी : केतकी कालेकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा