चीन विवादाच्या पार्श्वभूमीवर आज ५ वाजता होणार सर्वपक्षीय बैठक

नवी दिल्ली, १६ सप्टेंबर २०२०: चीन सोबत लडाखमध्ये सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकारनं सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. बुधवारी संध्याकाळी पाच वाजता ही बैठक होऊ शकते, ज्यामध्ये अनेक राजकीय पक्षांचे नेते सहभागी होतील. चीनशी झालेल्या वादावर संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी लोकसभेत दिलेल्या विधानानंतर ही बैठक आयोजित केली जात आहे.

या सर्वपक्षीय बैठकीत सरकार संसद अधिवेशनाच्या आगामी दिवसांच्या आराखड्याविषयी बोलणार आहे. विरोधकांकडून घेतलेल्या आक्षेपांवरही चर्चा होईल. या बैठकीत काँग्रेस पक्ष एलएसीच्या मुद्यावर चर्चेची मागणी करू शकतो.

या मुद्द्यावर सरकारनं संसदेमध्ये स्पष्टीकरण दिलं होतं. मात्र, विरोधकांनी यावर सविस्तर चर्चेची मागणी केली होती. ज्यासाठी काँग्रेसनं लोकसभेत निषेधही केला होता. आता सरकार कडून देखील चर्चेसाठी ही बैठक बोलावण्यात येत आहे.

जेव्हा पावसाळी अधिवेशन सुरू झालं आणि प्रश्नोत्तराचे तास रद्द केले गेले त्यानंतरही काँग्रेस, टीएमसीसह अनेक विरोधी पक्षांनी सरकारवर चीनच्या मुद्दय़ावरून चर्चेपासून पळ काढल्याचा आरोप केला.

लोकसभेत राजनाथ सिंह यांनी आपल्या निवेदनात म्हटलं आहे की लडाखची परिस्थिती गंभीर आहे आणि एलएसीची सद्य परिस्थिती बदलण्याचा चीन प्रयत्न करीत आहे. एप्रिलपासून आत्तापर्यंतची सर्व माहिती देताना राजनाथ म्हणाले की, आम्हाला हा वाद वाटाघाटीद्वारे सोडवायचा आहे परंतु परिस्थिती बदलल्यास भारतीय सेना तयार आहे.

विपक्ष करत आहे घेरण्याचा प्रयत्न

चीन विवाद सुरू झाल्यापासून राहुल गांधी सातत्यानं केंद्र सरकारला घेरण्याचा प्रयत्न करत आहेत. विशेष म्हणजे काल गृहमंत्र्यांनी केलेल्या वक्तव्यानंतर पंतप्रधान देशाची दिशाभूल करत आहेत असं देखील त्यांनी काल म्हटलं. गेल्या काही दिवसांपासून राहुल गांधी सातत्यानं ट्विट करून सरकारला विविध मुद्द्यांवर घेरण्याचा प्रयत्न करत आहेत. आज होणाऱ्या बैठकीत देखील चीन मुद्द्यावरून सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा