शहर नष्ट करू शकणारा लघुग्रह पृथ्वी जवळ येत आहे, पण घाबरू नका

पुणे २४ मार्च २०२३: शनिवारी म्हणजे २५ मार्च रोजी एक महाकाय लघुग्रह पृथ्वीवरून जाणार आहे. अंतराळ शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार हा लघुग्रह इतका जवळ असेल की उद्या रात्रीच्या आकाशात तो दुर्बिणीद्वारे शोधता येईल. वेळेआभावी खगोलशास्त्रज्ञांना फक्त १००,००० मैल (१,६८,००० किलोमीटर) अंतरावरून लघुग्रहाचा अभ्यास करण्याची संधी मिळेल. हे अंतर इथून चंद्रापर्यंतच्या अंतराच्या निम्म्याहून कमी आहे, त्यामुळे ते छोट्या दुर्बिणद्वारे पाहणे सुध्दा शक्य आहे.

हा लघुग्रह एवढा मोठा आहे की तो एखादे शहर सहज नष्ट करु शकतो, मात्र अमेरिकेची अंतराळ संस्था नासाने हा लघुग्रह पृथ्वीवर येणार नाही अशी ग्वाही दिली आहे. लघुग्रह हा एक सामान्य खगोल प्राणी असला तरी नासाने सांगितले की हा नवीन लघुग्रह दुर्मिळ आहे आणि तो दर दशकात एकदाच पाहिला जाऊ शकतो.

२०२३ DZ2 असे नाव देण्यात आलेल्या या लघुग्रहाच्या आकाराचा अंदाज शास्त्रज्ञांनी १३० ते ३०० फूट दरम्यान असल्याचा लावला आहे.

न्यूज अनकट प्रतिनीधी: केतकी कालेकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा