गोल पोस्ट गुन्हा माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदेंचा मोबाईल रेल्वेत चोरण्याचा केला प्रयत्न

माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदेंचा मोबाईल रेल्वेत चोरण्याचा केला प्रयत्न

सोलापुर, १० ऑक्टोबर २०२२: सोलापुरचे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा मोबाईल चोरण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी सोलापुरामधील राष्ट्रवादीच्या ग्रामपंचायत सदस्याच्या मुलाला ताब्यात घेण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनूसार गुरुवारी सकाळी सहा वाजता ही घटना घडली आहे.

मंदार प्रमोद गुरव वय वर्ष तेवीस राहणार घाटणे, तालुका माढा जिल्हा सोलापुर असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे आणि त्यांची कन्या आमदार प्रणिती शिंदे यांना कामानिमित्त मुंबईला जायचे होते. त्यांचे रिझर्वेशन गाडी नं- १२११६ सिद्धेश्वर एक्सप्रेस बोगीच्या एचए १ कंपार्टमेंट मधील कुपी नं ए मध्ये केले होते.

दादर रेल्वे स्टेशन येण्यापुर्वी शिंदे हे बाथरूमला गेले होते. ते बाथरूममधून बाहेर आले असता, मंदार गुरव हा शिंदे यांच्या सीटवर ठेवलेला मोबाईल फोन घेऊन जाण्याचा प्रयत्न करत होता. शिंदे यांनी त्याला पकडून ठेवले आणि पोलीस हवालदार गांवकर आणि राजेशिर्के याना कुपी मध्ये बोलावून घेतले.

या प्रकरणी हवालदार गांवकर यांनी दादर रेल्वे पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला. पुढील तपास पोलीस करत आहेत.

न्युज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर

error: Content is protected !!
Exit mobile version