नवी दिल्ली, २२ नोव्हेंबर २०२०: कोरोना संकटाच्या वेळी सुरू झालेल्या १५ व्या जी -२० शिखर परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, दुसऱ्या महायुद्धानंतर कोरोना हे जगासाठी सर्वात मोठं आव्हान आहे. त्यांनी कोरोनानंतरच्या जगासाठी नवीन जागतिक निर्देशांक तयार करण्याची मागणी केली ज्यात चार मुख्य घटकांचा समावेश आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही या परिषदेत हजेरी लावली. सौदी अरेबियाचे किंग सलमान या संमेलनाचे अध्यक्ष आहेत.
पंतप्रधान मोदींनी कोरोनानंतर जगासाठी नवीन वैश्विक निर्देशांकांची मागणी केली असून त्यात चार प्रमुख घटक आहेत. तंत्रज्ञान समाजातील सर्व घटकांपर्यंत पोहोचावं यासाठी एक भव्य टॅलेंट पूल बांधायला हवा. शासनाच्या प्रणालीमध्ये पारदर्शकता आणि विश्वासार्हतेच्या भावनेसह धरती मातेची सेवा केली जावी. यावर आधारित, जी -२० नवीन जगाचा पाया घालू शकंल.
मानवतेच्या इतिहासात महत्त्वपूर्ण वळण: पंतप्रधान मोदी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावर्षी जी -२० च्या यशस्वी अध्यक्षपदाची आणि कोविड -१९ च्या साथीनं उद्भवलेल्या आव्हानं व अडथळ्यांनाही न जुमानता २०२० मधील दुसर्या जी -२० शिखर परिषदेचे आभासी आयोजन करण्यासाठी सौदी अरेबिया आणि त्याचं नेतृत्व यांचं अभिनंदन केलं.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या संबोधनात कोविड -१९ ला मानवतेच्या इतिहासातील एक महत्त्वपूर्ण वळण म्हटलं आहे. तसंच दुसऱ्या महायुद्धानंतर जागतिक स्तरावरील एक सर्वात मोठं आव्हान म्हणून देखील संबोधलं. त्यांनी जी -२० च्या माध्यमातून निर्णायक कारवाईचं आवाहन केलं, हे निर्णायक कार्य केवळ आर्थिक सुधारणा, नोकरी आणि व्यापारपुरते मर्यादीत नाही तर संपूर्ण पृथ्वीच्या संरक्षणावरही लक्ष केंद्रित केले पाहिजे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे