दीगड, ३ सप्टेंबर २०२२: पंजाब पोलिसांनी मध्यप्रदेशातील दोन रहिवाशांना अटक करून शस्त्रं निर्मिती आणि तस्करी करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश केला, असे डीजीपी गौरव यादव यांनी सांगितले.
पंजाब पोलिसांच्या काउंटर इंटेलिजन्स युनिटने मध्यप्रदेश पोलिसांच्या मदतीने या दोघांना मध्ये प्रदेशातून अटक करण्यात आले. ते मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्र निर्मिती आणि पंजाब तसेच इतर राज्यांमध्ये त्यांचा पुरवठा करण्यात गुंतले होते अशी माहिती पीटीआय या वृत्तसंस्थेने दिली.
भोरेलाल उर्फ मनीष बडे खरगोंमधिल रतवा गाव आणि केलाश मल सिंग, बुरहानपुर जिल्ह्यातील दत्त पहारी गाव अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत.
डीजीपी यादव म्हणाले की, काउंटर इंटेलिजन्स युनिटने अमृतसरमधून दोन जणांना त्यांच्या ताब्यातून चार पिस्तूल जप्त केल्यानंतर तीन आठवड्यांची ही घटना आहे. या संदर्भात १० ऑगस्ट रोजी अमृतसरमध्ये आयपीसी आणि शस्त्रास्त्र कायद्याच्या विविध तरतुदिंनुसार एफआयआर नोंदवण्यात आला होता.
पंजाब पोलिसांनी एका निवेदनात म्हंटले आहे की, राज्याला गुन्हेगारी आणि अमली पदार्थांपासून मुक्त करण्यासाठी या बेकायदेशीर शस्त्रे आणि अमली पदार्थांच्या पुरवठा नेटवर्कचा मुळापासून पर्दाफाश करण्यासाठी त्यांनी सक्रिय दृष्टिकोन स्वीकारला आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: सुरज गायकवाड