पुणे, १६ सप्टेंबर २०२० : खगोलशास्त्रज्ञांच्या आंतरराष्ट्रीय गटाने नुकताच विश्वातील सर्वात मोठ्या रचना असणाऱ्या महाकाय रेडिओ दीर्घिकांचा अर्थात जायंट रेडिओ गॅलेक्सीचा पहिला सविस्तर आराखडा प्रसिद्ध केला असून यात भारतीय संशोधकांचा महत्त्वाचा वाटा आहे. जगभरातील विविध रेडिओ दुर्बिणींच्या नोंदी वापरून आतापर्यंत विश्वातील एकूण ८२० महाकाय रेडिओ दीर्घिकांचा शोध लागला आहे.
त्यांपैकी ३८७ महाकाय दीर्घिकांचा शोध पुण्यातल्या “आयुका” संस्थेतले खगोलशास्त्रज्ञ प्रतीक दाभाडे यांच्या पुढाकाराने सुरू झालेल्या प्रकल्पातून लागला आहे. हे संशोधन ‘ॲस्ट्रोनॉमी अँड ॲस्ट्रोफिजिक्स’ या प्रख्यात जर्नलमध्ये प्रसिद्ध झालं असून दिवंगत ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ डॉ. गोविंद स्वरूप यांना हे संशोधन समर्पित करण्यात आलं आहे, असं प्रतिक दाभाडे यांनी आकाशवाणीशी बोलताना सांगितलं.
या नकाशामुळे आणि नव्याने शोधलेल्या दीर्घिकांमुळे जगभरातील खगोलशास्त्रज्ञांना याबाबत आणखी सखोल संशोधन करणे शक्य होईल, असं ते म्हणाले.
न्यूज अनकट प्रतिनिधी:












































