एका प्रशांत अवलियाच्या नाटकाच्या प्रयोगाचा महासागर..

पुणे, ३ नोव्हेंबर, २०२२ : तसा तो लोकांच्या प्रशांत मनावर अधिराज्य करतोच आहे. पण आता तो जागतिक रंगभूमीच्या रेकॉर्डवर राज्य करणार आहे. तब्बल १२,५०० प्रयोग करत त्याने भारत नव्हे तर जग जिंकलं आहे. तोच हा अवलिया प्रशांत दामले अर्थात द प्रशांत दामले… मुंबईच्या षण्मुखानंद सभागृहात हा ऐतिहासिक विक्रम घडणार आहे. तो ऐतिहासिक दिवस असणार आहे… ६ नोव्हेंबर, २०२२.. आणि प्रयोगासाठी नाटक निवडले गेले आहे एका लग्नाची पुढची गोष्ट…

काही कलाकार हे केवळ नाटकासाठी असतात तर काही कलाकार हे सिनेमासाठी. पण प्रशांत दामले हे एक असं रसायन आहे की, ते ज्या साच्यात टाकाल, त्या साच्यातून ते तुमच्यापर्यंत केवळ मनोरंजन पोहोचवते. त्याने रंगभूमीला आपलंसं केलं आणि त्याचे ऋण फेडत रंगभूमीने त्यांला जणू मिठीच मारली.

५ जानेवारी २०१३ रोजी प्रशांत दामले यांनी सर्वाधिक नाटकाचे प्रयोग करण्याचा विक्रम केला. ते नाटक होतं गेला माधव कुणीकडे आणि प्रयोग क्रमांक होता १०,७०० वा. त्यावेळी प्रशांत दामले यांचा विक्रम हा जागतिक स्तरावर दुस-या क्रमांकावर होता. ज्याचे नामांकन गिनिज वर्ल्ड बुक मध्ये झाले होते. अजब गोष्ट म्हणजे त्याचा हा विक्रम तो स्वत:च मोडणार आहे.

अतिशय मनमिळाऊ, खादाड आणि गप्पीष्ट असणा-या प्रशांत दामलेंच्या कार्याची नोद स्मृतीगंध या सोशल वाहिनीने घेतली असून या त्यांच्या नाटकाच्या आयुष्यात येणा-या प्रत्येकाने प्रशांतबरोबरच्या गमतीजमती शेअर केल्या आहेत. त्यामुळे प्रशांत प्रत्येकाबरोबर कसा आणि काय गंमत करतो, याची जणू प्रत्येकजण साक्षच देत आहे.

त्यामुळे संपूर्ण मराठी कलाक्षेत्र ६ नोव्हेंबरची आतुरतेने वाट पहात आहे. कारण एकच… एका लग्नाची पुढची गोष्ट पहायला …. सांगायला … आणि प्रशांतला भरभरुन शुभेच्छा द्यायला.

ऑल द बेस्ट THE EVERGREE PRASHANT DAMALE

न्यूज अनकट प्रतिनिधी- तृप्ती पारसनीस

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा