पुणे, २८ जानेवारी २०२३: शॉर्ट फिल्म असो अथवा कुठला रंगमंच, नेहमीच नवोदित कलाकारांना आपली कला सादर करण्याची संधी देणारी पुण्यातील ऐक्य कलाविष्कार संस्थेनं आता कात्रज, धनकवडी, आंबेगाव, धायरी, नऱ्हे या भागातील नवोदित कलाकारांसाठी अगदी माफक दरात अभिनयाचं प्रशिक्षण देण्याचा उपक्रम हाती घेतला आहे.
नीलअमृत फिल्म्ससोबत ऐक्य कलाविष्कार संस्था ऐक्य ऍक्टिंग इन्स्टिट्यूट नावानं आपला नवीन उपक्रम सुरू करणार आहेत. यात प्रत्येक विद्यार्थ्यांना प्रशिक्षणांती संस्थेमार्फत सादर करण्यात येणाऱ्या प्रोजेक्ट मध्ये काम करण्याची हमखास संधी मिळणार आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क:
९२७२१२००४० / ८६९८४ ६५४९२