पुणे-शिक्रापूर : पत्नीचे प्रियकराशी असलेले अनैतिक संबंध उघड झाल्याने चिडूनपतीने पत्नीच्या प्रियकराचा खून केल्याचा प्रकार बुधवारी (दि. १५ जानेवारी रोजी) शिक्रापूर येथे घडला. दिलावर शेख (रा. वाकत ता. रिसोड जि. वाशिम) असे मृतकाचे नाव आहे. तर याप्रकरणी आयुब सिकंदर शेख (रा. रिसोड, जि. वाशिम) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याप्रकरणी मिळालेली माहिती अशी की, आरोपी आयुब सिकंदर शेख याने मयत मोईन याचे आणि आपल्या पत्नीचे अनैतीक संबंध प्रत्यक्ष पाहिले. त्यामुळे चिडून जाऊन शेख याने मोईन याच्या डोक्यात हातोडी मारली. त्यातच दिलावर खान याचा मृत्यू झाला. याप्रकरणी शेख याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.