आनंद महिंद्रा यांनी दिलेलं वचन पाळलं, ‘जुगाड’च्या बदल्यात दिली नवी बोलेरो

Anand Mahindra Twitter, 26 जानेवारी 2022: महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे प्रमुख आनंद महिंद्रा यांनी पुन्हा एकदा आपलं वचन पाळलं आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी ट्विटरवर एका व्यक्तीला ‘जुगाड’ कारच्या बदल्यात नवीन बोलेरो देण्याचं वचन दिलं होतं, आता त्यांनी ते पूर्ण केलंय…

दत्तात्रेय लोहार यांनी बनवली ‘जुगाड’ कार

आनंद महिंद्रा यांनी गेल्या महिन्यात ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर केला होता. हिस्टोरिकॅनो या YouTube चॅनलनुसार, हा व्हिडिओ महाराष्ट्रातील दत्तात्रेय लोहार यांचा आहे, ज्यांनी आपल्या मुलांचा हट्ट पूर्ण करण्यासाठी महिंद्र थारसारखं दिसणारं चारचाकी वाहन बनवलं.

महिंद्रा यांनी व्यक्तीच्या क्षमतेबद्दल प्रशंसा केली होती, परंतु त्या व्यक्तीला सुरक्षिततेच्या धोक्याच्या बदल्यात नवीन बोलेरो भेट देण्याची घोषणा केली होती. यासोबत हे वाहन आपल्याला ‘कमी संसाधनातही रिसोर्स रिच’ होण्याची प्रेरणा देते, असं लिहिलं होतं.

महिंद्रा बोलेरो ही एक वचनपूर्ती

आनंद महिंद्रा यांनी हे आश्वासन पूर्ण केलं. दत्तात्रेय यांच्या कुटुंबीयांना बोलेरो भेट देतानाचे काही फोटो त्यांनी ट्विटरवर शेअर केले आहेत. त्यात लिहिले होते, “त्यांनी (दत्तात्रेय लोहार) त्यांची कार बदलून नवीन बोलेरो आणण्याची आमची ऑफर स्वीकारली याचा आनंद आहे. काल त्यांच्या कुटुंबाला नवीन बोलेरो मिळाली आणि आतापासून त्यांची कार आमच्या मालकीची आहे. त्यांचं हे वाहन आमच्या महिंद्रा रिसर्च व्हॅलीतील सर्व प्रकारच्या गाड्यांच्या संग्रहाचा भाग असंल, ते आम्हाला साधनसंपन्न होण्यासाठी प्रेरणा देईल.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा