आंनद शिंदेचं अवाहन तर रामदास आठलेंचा बौद्धविहार बांधण्याचा निर्धार…..

मुंबई, ३१ जुलै २०२० : अयोध्येत ५ तारखेला राम मंदीर भूमिपुजनाचा कार्यक्रम होणार आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हा कार्यक्रम पार पडणार असून कोरोना माहामारीची परिस्थिती लक्षात घेऊन २०० जणांच्या उपस्थितीत हा सोहळा होणार आहे.याच पार्श्वभूमीवर दोन दिवसापुर्वी असद्दुदीन ओवेसी यांची खद्खद् करणारी टिका चर्चेत आली होती.तर आता बहुजन समाजाचे केंद्रीय मंत्री आणि महाराष्ट्राचे लाडके गायक आंनद शिंदे यांचे व्यक्तव्य सध्या सर्वत्र चर्चेचा विषय ठरत आहेत.

आंनद शिंदेंच व्यक्तव्य…..

महाराष्ट्राच्या संगीतामध्ये अमुल्य योगदान देणारे आंनद शिंदे यांनी अयोध्येमध्ये उत्खननात सापडलेले बौद्धकालीन अवशेषाचे जतन करण्यासाठी सरकारने अयोध्येत बौद्धविहार उभारण्याची मागणी करत जनतेने पुढे यावे आसे अवाहन केले आहे.त्या बरोबरच त्यांनी एक विशेष गोष्ट नमूद केली आहे.यामध्ये राजकारण आणण्याची गरज नाही.असेही ते म्हणाले. त्यांच्या या मागणीपर सध्या सोशल मिडियामध्ये संमिश्र अशा प्रतिक्रिया येत आहेत.तर त्यांच्या समर्थनात आरपीआयचे सर्वेसर्वा आणि आणि खासदार रामदास आठवले यांनीही आपले मत नोंदवले आहे.

रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व खासदार, रामदास आठवले यांची भुमिका…..

रामदास आठवले यांनी अयोध्येत “राम मंदिराचं भूमिपूजन पार पडल्यानंतर मुखमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेणार असल्याचं सांगितलं आसून.अयोध्येत ३० एकर जमिनीवर भव्य बौद्धविहार बांधणार असल्याचं यांनी म्हटलं आहे.त्या बरोबरच त्यांनी आंनद शिंदे हे त्यांचे चांगले मित्र असून ते जे सांगत आहेत. त्यासाठी आधीपासूनच आपण प्रयत्नशील असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.सगळ्या नेत्यांना एकत्र करणं हा राजकीय विषय आहे.आणि मी तर स्वत: प्रयत्न करणार आहे. सगळ्या नेत्यांना एकत्र आणून वेळ खर्च करण्यापेक्षा मी स्वत: यामध्ये लक्ष घालणार आहे असे ते म्हणाले.आणि अयोध्येत एक सुंदर बौद्धविहार बांधल्या शिवाय मी स्वस्त बसणार नाही असेही ते पुढे बोलले.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा