रामाचा प्रतिमेचे पूजन करून पुणे शहर भाजप कार्यालयात आनंदोत्सव

पुणे, ५ ऑगस्ट २०२० : पाच शतकांच्या संघर्षानंतर आज प्रभू श्रीरामांचा वनवास संपला. अयोध्येत राम जन्मभूमीवर आज माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भव्य राम मंदिराचे भूमिपूजन केले. या निमित्ताने आज संपूर्ण देशभर दिवे लावून, गुढी उभारून, रामाच्या प्रतिमेचे पूजन करून जल्लोष साजरा केला जात आहे.

त्यानिमित्त आज पुणे शहर भाजपा कार्यालयातही आनंदोत्सव साजरा करण्यात आला. येथे श्रीरामाच्या प्रतिमेचे पूजन केले व त्यासोबतच कित्येक शतकांचा अंधःकार नाहीसा झाला आणि एका स्वाभिमानी युगाची सुरुवात झाली म्हणून पुणे शहर भाजपा कडून सांस्कृतिक विजयाचं प्रतीक म्हणून गुढी उभारून पूजन करण्यात आले. पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला गेला. यावेळी ‘जय श्री राम’ नावाने जयघोष करत एकत्र गाणी म्हणत, ताल धरत आनंद साजरा करण्यात आला. यावेळी मा.आमदार व भाजप शहराध्यक्ष जगदीश मुळीक व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ज्ञानेश्वरी आयवळे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा