आणि तब्बल ६ महिन्यानंतर वाह ताज

आग्रा, २२ सप्टेंबर २०२० : जगातील आठ अश्चर्यापैकी एक असे सुंदर पर्यंटन स्थळ म्हणजे ताज महाल. अनलॉक ४ च्या नियमानुसार तब्बल ६ महिन्यानंतर तो पर्यटकांसाठी खुला करण्यात आला आहे.
याबरोबरच तेथे सोशल डिस्टंसिंगचे पालन करणे आवश्यक असणार आहे. हाताच्या बोटावर मोजण्या इतपतच पर्यटक पहिल्यादिवशी ताजमहाल पाहण्यास आले होते, आणि यात कुतुहलाची गोष्ट म्हणजे ताजमहालात प्रवेश करणारा पहिला पर्यटक हा चीनी होता.

यावेळी ताजमहालाची तिकिटे ऑनलाईन काढण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे ताजमहालच्या कक्षात एकाच वेळी फक्त ५ पर्यटकांना जायची परवानगी आहे. ऑनलाईन पेमेंटद्वारे पार्किंग आणि इतर तिकिटे देखील घेता येणार आहे. ताजमहालात प्रवेश करताना मास्क घालणे व सोशल डिस्टंसिंगचे पालन करणे अनिवार्य आहे. शू कव्हर, टिश्यू पेपर, रिकाम्या बाटल्या कच-याच्या डब्यात टाकणे अनिवार्य आहे. तसेच यावेळी फोटोग्राफीवर ही बंदी घातली आहे.

दरम्यान ASI चे अधीक्षण पुरातत्व शास्त्रज्ञ बसंतकुमार स्वर्णकार यांनी सांगितले की, ‘ ताजमहालामध्ये १ दिवसात ५००० पर्यटकांना प्रवेश दिला जाईल, मास्क आणि सोशल डिस्टंसिंगची काळजी घेतली जात आहे. तर ग्रुप फोटोग्राफी आणि ताजमहालाच्या रेलिंग, भिंतींना स्पर्श करण्यास मनाई आहे. ताजमहाला मधील प्रत्येक जागा वेळोवेळी स्वच्छ केल्या जात आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी:

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा