अंगणातील राजकारण

महाराष्ट्र देशाला सामाजिक आर्थिक राजकीय दिशा देणारे राज्य देशातील इतर राज्यांच्या तुलनेने महाराष्ट्रातील राजकारण हे नेहमीच वेगळ्या परडी तले पुरोगामी विचारांचा वारसा सांगणारा आहे. या वेळेला देशात कुठेही पहायला न मिळालेली राजकीय युती महाराष्ट्रात पाहायला मिळत आहे दोन वेगवेगळ्या विचारधारेचे पक्ष आज महाराष्ट्राच्या सत्तेच्या सारीपाटावर राज्य करत आहेत व जे मुळातच नैसर्गिक रित्या एकच विचारधारेच्या आहेत त्यापैकी एक सत्तेवर आरूढ आहे व दुसरा पक्ष विरोधी बाकावर आहे. आज महाराष्ट्राच्या सत्तेच्या सारीपाटावर विरोधी पक्ष म्हणून भारतीय जनता पक्ष काम पाहत आहे राज्यात थैमान घातले असताना दिवसेंदिवस हा आकडा ही वाढत जात आहे.

प्रशासन सरकार सर्वतोपरी काम करत असताना या नैसर्गिक आपत्ती समोर हतबल होताना दिसत आहे, त्यामुळेच विरोधी पक्षांनी राज्यपालांना जाऊन सत्तारूढ पक्ष या परिस्थितीत पूर्णपणे अपयशी ठरत आहे असा आरोप केला गेला व त्याचबरोबर सरकार अपयशी ठरत आहे त्या गोष्टी साठी विरोधी पक्ष म्हणून विरोधी पक्षनेते श्री देवेंद्र फडणवीस व चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली काळ्या फिती लावून महाराष्ट्र सरकारचा निषेध केला गेला.

विरोधी पक्ष म्हणून सत्ताधारी पक्षावर अंकुश ठेवण्याचे काम कुठे चुकत असेल तर ते निदर्शनास आणून देण्याचा अधिकार हा विरोधी पक्षाचा आहे व सनदशीर मार्गाने आंदोलनही करण्याचा अधिकार आहे पण भारतीय जनता पक्षासारख्या जो स्वतःला बुद्धिजीवी व अभ्यास पूर्णपणे काम करणाऱ्या पक्षाने ही वेळ नव्हती आंदोलन करण्याची सत्यामध्ये ही माणसेच आहेत याचा कदाचित ते चुकतही असतील पण अशा पद्धतीचे आंदोलन करून भारतीय जनता पक्षाने स्वतःच्याच पायावर ती दगड मारून घेतला आहे. या उलट तुम्ही स्वतःहून पुढे होऊन सरकारच्या मदतीला उभे राहायला पाहिजे होते सरकारच्या मदतीला तुम्ही खांद्याला खांदा लावून उभे राहिला पाहिजे होते व त्यामुळे प्रशासनाला खूप मोठी ऊर्जा मिळाली असते काम करण्यासाठी हे आंदोलन करत असताना सर्वसामान्य लोक कामगार मजूर यांना काहीएक देणे-घेणे नव्हते कारण सर्वांनी मान्य केले आहे की ही एक नैसर्गिक आपत्ती आहे व सरकार आपल्या मदतीला आहे पण आपलेही काहीतरी योगदान आहे म्हणून सरकार देईल ते नियम जनता पाळत आहे व सरकारला कोणीही दोष देत नाही किंबहुना सहकार्य करत आहे.

साधे उदाहरण द्यायचे म्हटले तर पन्नास दिवस लोक डाऊन मध्ये दारू दुकाने उघडी नाही म्हणून कोणीही आंदोलन केले नाही याउलट जोपर्यंत सरकार परवानगी देत नाही तोपर्यंत वाट पाहिली पण कोणीही विरोध केला नाही पेट्रोल पंपावरती सुद्धा अत्यावश्यक सेवा सोडून पेट्रोल दिले नाही, पोलिसांनी गाड्या जप्त केल्या, सर्वांना जनतेने सहकार्य केले पण कोणीही विरोध केला नाही राज देशमुख यासारख्या अवलिया पुण्यात लोकांना पायी जाणाऱ्या स्वतःहून चपलांचे वाटप करत आहे असे ज्ञात-अज्ञात असंख्य कार्यकर्ते आपल्या परीने काम करताहेत ते सरकार वर रोश करून नाहीत.

पुरोगामी महाराष्ट्रातील तुम्ही विरोधी पक्ष म्हणून या वेळेला तरी राजकारण बाजूला ठेवावा अशा भीषण परिस्थितीत सर्वांनी एकदिलाने काम करावे, तुम्ही आंदोलन करण्यापेक्षा केंद्रामध्ये तुमचे सरकार आहे तुम्ही पुढे होऊन केंद्रातून यावेळेला एक रुपया जरी महाराष्ट्रासाठी आणला तरी महाराष्ट्रातील जनता तुम्हाला विसरणार नाही. ही वेळ नाही आहे आंदोलनाची ही वेळ आहे महाराष्ट्राला सावरण्याची जनतेला दिलासा देण्याची जर अशा वेळेला राजकारण करणार असाल तर महाराष्ट्र महाराष्ट्रातील जनता सुज्ञ आहे त्यांना कळतं की तुम्हाला मेरा देश मेरा अंगण म्हणायचे होते की श्री उद्धवजी ठाकरे यांना सांगायचे होते हमारे अंगने में तुम्हारा क्या काम है.

अशोक कांबळे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा