ब्रेकअप झाल्याचा राग धरुन, प्रियसीच्याच घरी चौदा लाखांचा डल्ला,

पुणे ,०८ ऑक्टोबर २०२२: पुण्यातील आंबेगाव मध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ब्रेकअप झाल्याचा राग मनात धरुन एका प्रियकराने प्रियसीच्याच घरात चोरी केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी संशयित आरोपीस ताब्यात घेतले आहे.

सतीश परदेशी असे आरोपीचे नाव आहे. मिळल्या माहितीनूसार, पुण्यातील आंबेगाव येथील लक्ष्मी गार्डन सोसायटी भागात दोन दिवसांपुर्वी घरफोडीची घटना घडली होती. या बाबत एका तरुणीने फिर्याद दिली होती. त्यानंतर भारती विद्यापीठ पोलिसांनी चोरट्याचा शोध सूरु केला.

तपास करत असताना पोलिस घटनास्थळी पोहचले आणि आजूबाजुला तपास करताना त्यांना तेथे सीसीटिव्ही दिसून आले. पोलीसांनी फुटेज तपासले असता आरोपीची ओळख पटली. आरोपीला अटक केली असता त्याने सर्व प्रकार सांगितला की त्या मुलींने माझ्याशी ब्रेकअप केले म्हणून मी तिच्या घरी चोरी केली.

आरोपी सतीश परदेशी याच्या कडून २८ तोळ्याचे सोन्याचे दागिने,आणि रोख रक्कम असा १४ लाख ६७ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पुढील तपास पोलीस करत आहेत.

न्युज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा