सौरभ गांगुलींवर ॲन्जिओप्लास्टी, क्रिटिकल होते ब्लॉकेज

कोलकाता, ३ जानेवारी २०२१: बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलींची प्रकृती अचानक बिघडली, त्यानंतर त्यांना कोलकाताच्या वुडलँड्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. शनिवारी सकाळी गांगुलींची प्रकृती खालावली. अहवालानुसार सौरव गांगुली जिममध्ये कसरत करत होते, ही जिम सौरव गांगुलींच्या घरात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी सकाळी गांगुलींना घरातील जिममध्ये कसरत करताना छातीत दुखत होते. यानंतर कुटुंबीयांनी त्यांना तातडीने कोलकाताच्या वुडलँड्स रुग्णालयात दाखल केले.

४८ वर्षीय सौरव गांगुलींची अँजिओप्लास्टी झाली. सौरव गांगुलींची प्रकृती आता स्थिर आहे. गांगुलींनी अँजिओप्लास्टी केली त्यानंतर हृदयाच्या नसामध्ये स्टेंट घातला. याक्षणी सौरव गांगुली उत्तम प्रकारे ठीक आहे.

अध्याप कोणती टेस्ट केली नव्हती: ममता बॅनर्जी

दरम्यान, केंद्रीय गृहराज्यमंत्री अमित शहा यांनी सौरव गांगुलींची पत्नी डोना यांच्याशी फोनवर बोलून गांगुलींच्या प्रकृतीची विचारपूस केली. दरम्यान, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी गांगुलींची काळजी घेण्यासाठी रुग्णालयात गेल्या. या माजी क्रिकेटपटूची भेट घेतल्यानंतर ममता म्हणाल्या की सौरभ गांगुली यांची प्रकृती आता स्थिर आहे.

ममता बॅनर्जी म्हणाल्या की, “सौरभ गांगुली यांची तब्येत आता स्थिर आहे ते रेस्ट घेत आहेत. मला आश्चर्य या गोष्टीचे वाटते की आत्तापर्यंत त्यांनी याबाबत एकही टेस्ट करून घेतली नव्हती. ते एक खेळाडू आहेत आणि या दरम्यान आपल्याला त्यांना एवढी गंभीर समस्या असेल हे वाटले देखील नव्हते. त्यांची अँजिओप्लास्टी करण्यात आली आहे. डॉक्टरांचे यासाठी मी आभार मानते.”

क्रिटिकल होते ब्लॉकेज

बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांची प्रकृती अद्याप स्थिर आहे. कोलकाताच्या वुडलँड्स हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार देत असलेले डॉ. आफताब खान म्हणाले की, “सौरव गांगुली यांची अँजिओप्लास्टी झाली आहे. त्यांची तब्येत स्थिर आहे. २४ तास त्यांचे परीक्षण केले जाईल. त्यांना आता पूर्ण शुद्ध आली आहे. त्यांच्या हृदयामध्ये दोन ब्लॉकेज होते.” वुडलँड हॉस्पिटलचे सीईओ डॉ. रुपाली बसू आणि डॉ. सरोज मंडलने सांगितले की “त्यांच्या हृदयात अनेक ब्लॉकेज आले आहेत, जे ‘गंभीर’ आहेत. त्याची तब्येत स्थिर आहे ही एक दिलासादायक बाब आहे. त्यांना स्टेंट बसविण्यात आले आहेत. ”

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा