मुंबई: आर कॉम वर प्रचंड कर्ज असून हे कर्ज फेडण्यासाठी दिवाळखोरी प्रक्रियेत असलेल्या कायद्यांतर्गत कारवाईत सहकार्य करा असे सांगत पाचही संचालकांचे राजीनामे नामंजूर करण्यात आले आहे. गेल्या २० नोव्हेंबर रोजी अनिल अंबानी आणि इतर चार संचालकांनी राजीनामे दिले होते.
दिवाळखोरीत निघालेल्या रिलायन्स कम्युनिकेशन च्या संचालक पदावरून अनिल अंबानी यांनी दिलेला राजीनामा कर्ज दात्यांनी नामंजूर केला आहे. अंबानी यांच्या समवेत छाया विराणी, रायना कारानी, मंजरी काकेर, आणि सुरेश रंगाचर त्यांनीसुद्धा कंपनीच्या संचालक पदाचा राजीनामा दिला होता मात्र या चार संचालकांचा राजीनामा देखील नामंजूर करण्यात आला आहे.
स्वित्झर्लंड ची टेलिकॉम कंपनी एरिक्सन थकीत रक्कम प्रकरणात कंपनी दिवाळखोरीत निघाली आहे. विशेष म्हणजे एरिक्सन ने दिवाळखोरीची मागणी केल्यानंतर अंबानी यांनी न्यायालयासमोर हे प्रकरण मिटवण्याचे प्रयत्न केले होते. मात्र नंतर स्वतःहून दिवाळखोरी प्रक्रियेची मागणी केली होती. यानंतर आर कोम चा दिवाळखोरीची प्रक्रिया पार पाडण्यासाठी एनसीएलटी अनिश निरंजन नानावटी यांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.