शिवाजीराव भोसले बँक घोटाळा प्रकरणी अनिल भोसले यांच्या घरावर धाड

पुणे, २९ सप्टेंबर २०२०: शिवाजीराव भोसले बँक प्रकरणात चर्चेत असलेले हे अनिल भोसले यांच्या घरावर पोलिसांनी धाड टाकली. गेल्या दोन वर्षांपासून शिवाजी राव भोसले बँक घोटाळा प्रकरण चर्चेत आहे. तब्बल ७२ कोटी रुपयांहून अधिक रकमेच्या अपहारप्रकरणी आमदार भोसलेंवर गुन्हे दाखल झाले आहेत. याचीच कारवाई म्हणून आज ही धाड टाकण्यात आली. यावेळी त्यांच्या दोन आलिशान गाड्या जप्त करण्यात आल्या. भोसले यांच्या गाड्यांव्यतिरिक्त त्यांच्या किंमती वस्तूही जप्त करण्यात आल्या आहेत.

शिवाजीराव भोसले बँकेचे ऑडिट केले असता त्यामध्ये ७१ कोटी ७८ लाख कमी आढळले होते. हे ऑडिट २०१८-१९ दरम्यान केलं गेलं होतं आणि तेव्हा हा घोटाळा उघडकीस आला होता. सहकार कायद्यातील तरतुदींनुसार नुकसानीला जबाबदार असलेल्यांची संपत्ती जप्त करण्याचे अधिकार प्रशासनाला आहेत. त्यानुसार आज ही कारवाई केली गेली आहे. याप्रकरणी आणखी काही जणांवर लवकरच कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती आहे. यात पुणे जिल्हा परिषदेच्या माजी पदाधिकाऱ्यांचाही समावेश असल्याचं बोललं जात आहे.

काय आहे प्रकरण

भारतीय रिझर्व्ह बँकेनं शिवाजीराव भोसले सहकारी बँकेचे २०१८-१९ वर्षाचं ऑडिट करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार बँकेचं ऑडिट केलं असता, त्यात ७१ कोटी ७८ लाख रुपये कमी असल्याचं आढळलं. त्यानुसार शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये आमदार भोसले यांच्यासह शैलेश भोसले, तानाजी पडवळ, विष्णू जगताप आणि हनुमान सोरते यांच्यासह ११ पदाधिकाऱ्यांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. सीए योगेश लकडे यांनी याबाबत तक्रार दिली होती. भोसले यांच्यासह ११ जणांनी बँकेच्या रेकॉर्डमध्ये बनावट नोंदी दाखवल्या होत्या.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा