अनिल देशमुख आणि नवाब मलिक करू शकणार नाहीत मतदान, जाणून घ्या महाराष्ट्रातील 6 जागांचं संपूर्ण गणित

पुणे, 10 जून 2022: महाराष्ट्रात 10 जून रोजी राज्यसभेच्या 6 जागांसाठी निवडणूक होणार आहे. याच्या एक दिवसापूर्वीच महाविकास आघाडीला मोठा धक्का बसलाय. राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांना मतदानाचा हक्क मिळालेला नाही. याप्रकरणी दाखल करण्यात आलेली याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. दोन्ही नेते सध्या तुरुंगात आहेत.

यापूर्वी उमेदवाराला विजयासाठी 42 मतांची गरज होती, मात्र न्यायालयाच्या निर्णयानंतर आता महाराष्ट्रातील उमेदवाराला विजयासाठी 41 मतांची आवश्यकता आहे. उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळं महाविकास आघाडीच्या आमदारांची संख्या घटली आहे. याचा थेट फायदा भाजपला होऊ शकतो.

राज्यसभेच्या जागांचं गणित

महाराष्ट्रातील राज्यसभेच्या 6 जागांसाठी 7 उमेदवार रिंगणात आहेत. भाजपने पियुष गोयल, अनिल बोंडे आणि धनंजय महाडिक हे तीन उमेदवार उभे केले आहेत. शिवसेनेकडून संजय राऊत आणि संजय पवार हे दोन उमेदवार आहेत. राष्ट्रवादीने प्रफुल्ल पटेल यांना तर काँग्रेसने इम्रान प्रतापगढ यांना संधी दिलीय. सकाळी 9 ते दुपारी 4 वाजेपर्यंत मतदान सुरू राहणार आहे. सायंकाळी 5 नंतर मतमोजणी सुरू होईल.

कोणाकडं किती आमदार?

महाविकास आघाडीचे (167) आमदार आहेत. ज्यामध्ये शिवसेना (55), राष्ट्रवादी (51), काँग्रेस (44), समाजवादी पक्ष (2), पीजेपी (2), इंडी (13) यांचा समावेश आहे.

महाविकास आघाडीला अपक्षांचं समर्थन

महाविकास आघाडीला 13 अपक्ष आमदारांचा पाठिंबा आहे. ज्यामध्ये लोहा येथून श्याम सुंदर शिंदे, चंद्रपूरमधून किशोर जोरगेवार, मीरा भाईंदरमधून गीता जैन, भंडारा येथून नरेंद्र भोंडेकर, रामटेकमधून आशिष जैस्वाल, करमाळ्यातून संजय शिंदे, मुक्ताईनगरमधून चंद्रकांत पाटील, साक्रीमधून मंजुषा गावित, विनोद शंकर अग्रवाल, विनोद अग्रवाल, रामटेकमधून संजय शिंदे यांचा समावेश आहे. , राजेंद्र यड्रावकर, सीपीआयएमचे विनोद निखोळे आणि स्वाभिमानी पक्षाचे देवेंद्र भुयार.

हे आहे भाजपचं गणित

भारतीय जनता पक्षाचे 106 आमदार आहेत. त्यांना 7 अपक्षांचाही पाठिंबा मिळाल्याचा पक्षाचा दावा आहे. म्हणजेच एकूण 113 आमदार त्यांच्यासोबत आहेत. भाजपला पाठिंबा दिलेल्या अपक्ष आमदारांमध्ये इचलकरंजीतून प्रकाश आवडे, बार्शीतून राजेंद्र राऊत, उरणमधून महेश बालदी, बडनेरामधून रवी राणा, जनसुराज पक्षाचे विनय कोरे, राष्ट्रीय समाज पक्षाचे रत्नाकर गुट्टे, मनसेचे राजू पाटील यांचा समावेश आहे.

या आमदारांनी निर्णय घेतला नाही

5 आमदार असेही आहेत की त्यांनी कोणाला पाठिंबा द्यायचा हे अजून ठरवलेले नाही. त्यात बहुजन विकास आघाडीचे 3 आमदार आज ठरवतील, तर ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लीमीन (एआयएमआयएम)च्या 2 आमदारांशी राष्ट्रवादीची चर्चा सुरू आहे.

अशाप्रकारे कमी झाले 3 आमदार

महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा आहेत. नवाब मलिक आणि अनिल देशमुख तुरुंगात असल्याने मतदान करू शकणार नाहीत. त्याचवेळी शिवसेनेचे आमदार रमेश लट्टे यांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आता एकूण आमदारांची संख्या 285 झाली आहे. त्यामुळे प्रत्येक उमेदवाराला विजयासाठी 41 मतांची गरज आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा