आसाम राज्यात आफ्रिकन स्वाइन फ्लूने श्वानांचा मृत्यू

आसाम, दि.१३ मे २०२० : सध्या देशासह जगभरात कोरोनाने थैमान घातले असताना आसाम राज्यात एक वेगळेच संकटाने तोंड वर काढले आहे. या नवीन रोगामुळे दहा जिल्ह्यांमध्ये जवळपास चौदा हजारांपेक्षा जास्त श्वान मृत पावली आहेत. ज्या आजाराने ती श्वान मृत पावली. त्या आजाराचं नाव आहे आफ्रिकन स्वाइन फ्लू. मात्र , ज्या ठिकाणी या श्वानाचा मृत्यू झाला आहे. त्यांना तेथेच खड्डयात पुरून टाकण्याचा सल्ला देण्यात आला आहे.हा संसर्गजन्य रोग असल्याने तुपावर नियंत्रण मिळवण्याचे काम सरकारकडून करण्यात येत आहे. अशी माहिती आसाम राज्याचे पशुपालन मंत्री अतुल बोरा यांनी दिली आहे.

याबाबत बोरा यांनी सांगितले की, जेव्हा रोग आला तेव्हा सुरुवातीच्या टप्प्यात दिब्रुगड, शिवसागर, जोरहाट, धेमाजी, लखीमपूर आणि विश्वनाथ या जिल्ह्यांमध्ये त्याचे संक्रमण वाढत गेले. हा रोग पहिल्यांदा फेब्रुवारी महिन्यात समोर आला होता.
सध्या डुकरांची संख्या तीस लाखांच्या आसपास आहे. केंद्राकडून मंजुरी मिळाल्यानंतरही राज्य सरकारने डुकरांना लगेचच मारण्याचा निर्णय न घेता आजार रोखण्याचा पर्याय निवडल्याचेही बोरा यांनी म्हटले आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी:

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा