बारामती, २ फेब्रुवरी २०२१: शहरातील वत्सला शिवरकर वय ७५ वर्षे ही महिला मागील ८ वर्षांपासून तिच्या डोक्यावर जटांचे वजन घेऊन फिरत होती. अंधश्रद्धेतून निर्माण झालेल्या या जटांमुळे मोठ्या प्रमाणावर तिची शारीरिक, मानसिक हानी होत असल्याचे लक्षात आल्यावर अंनिसच्या कार्यकर्त्यांनी तिला जटांपासून मुक्त केले.
शिवरकर या महिलेच्या डोक्यावरील जटांमुळे व अस्वच्छतेमुळे तिच्या प्रकृतीवर शारीरिक व मानसिक आरोग्यावर विपरीत परिणाम झाल्याने ही महिला खुप त्रस्त होऊन खचून गेली होती. यावर बारामती मधील पिंकी अनिल धोत्रे, मोहन भोसले आणि अमोल चोपडे यांनी तिचे समुपदेशन करुन या महिलेस मोहन भोसले व अमोल चोपडे यांनी या महिलेस जटामुक्त केले.
जटा साफ करत असताना त्या महिलेच्या डोक्यात असणाऱ्या जखमांवरही प्रथमोपचार केले.यावेळी कॉम्रेड निलेश थोरात, सुशील कोरडे, रणजित कोळेकर, तेजस लकडे, श्रीकांत काळे, दत्ता चव्हाण यांनी मोलाचे सहकार्य केले. बारामती तालुका अंनिस यांनी नागरिकांनी अंधश्रद्धेतून होणाऱ्या गोष्टीकडे दुर्लक्ष करावे असे आवाहन करण्यात आले.
न्युज अनकट प्रतिनिधी: अमोल यादव