नागपूर, ११ फेब्रुवारी २०२४ : २०११ च्या जनगणनेनुसार अपंग व्यक्तीची लोकसंख्या २.६८ कोटी इतकी आहे .तसेच नुकत्याच प्रकाशित UDID च्या माहिती अहवालानुसार भारतात अपंग मतदाराची संख्या ही १ कोटीपेक्षा अधिक आहे. पण भारतात १० कोटीहून अधिक अपंग व्यक्ती आहेत. मात्र या अपंग व्यक्तीचा सर्वसमावेशक विचार केला जात नाही याची खंत वाटत असल्याचे NCPEDP या संस्थेच्या भंडारा येथील अंजली व्यास यांनी पत्रकार परिषदेत सांगीतले. भारताचा राजकीय दृष्टीकोन आणि अपंग मतदारसंघाचे समावेशन या गंभीर मुद्यांवर या पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.
अपंग व्यक्तींना मुख्य प्रवाहात समावेशित आणि एकिकृत करण्यासाठी सरकारचे प्रयत्न असताना, दिव्यांगजन सशक्तीकरण विभागाला एकूण अर्थसंकल्प वाटपाच्या केवळ ०.०२% प्राप्त झाले आहे.त्यामुळे गंभीर परिस्थिती उघड झाली आहे. यामुळे शिक्षण,आरोग्य ,रोजगार,आणि SIPDA सारख्या प्रमुख योजनांद्वारे एकूण सामाजिक समावेश सारख्या महत्वपूर्ण क्षेत्रावर परिणाम होणार असल्याचे म्हणत त्यांनी चिंता व्यक्त केली.
न्युज अनकट प्रतिनिधी : नीता सोनावणे