गोल पोस्ट स्पॉटलाइट अंकिता लोखंडेचा सर्वात मोठा खुलासा ; रिया चक्रवती बाबत सुशांत म्हणाला होता...

अंकिता लोखंडेचा सर्वात मोठा खुलासा ; रिया चक्रवती बाबत सुशांत म्हणाला होता की….

मुंबई ,३१ जुलै ,२०२० : सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्या प्रकरणी रोजच नव नवीन खुलासे होत आहेत. तसेच या प्रकरणाला आता वेगळे वळण लागले आहे. सुशांतच्या वडिलांनी अभिनेत्री रिया चक्रवर्तीच्या विरोधात पटणामध्ये गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे बिहार पोलिसांची एक टीम आता तपासणीसाठी मुंबईत दाखल झाली आहे. या टीमने सुशांत सिंग राजपूतची एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडेची चौकशी केली असता या चौकशीत सुशांत प्रकरणाबाबत अनेक धक्कादायक खुलासे उघडकीस आले आहेत.

पोलिसांनी केलेल्या चौकशी दरम्यान अंकिता लोखंडे म्हणाली की ,” सुशांत रिया चक्रवर्ती सोबतच्या नात्यात खुश नव्हता”. सुशांतने स्वतः अंकिताला वाढदीवसा दिवशी मेसेज करत याची माहिती दिली होती. सुशांत सोबतच हे चॅट देखील अंकिताने बिहार पोलिसांकडे सुपूर्त केलं आहे.

सुशांत आणि अंकिता मध्ये ब्रेकअप झाला असून सुद्धा सुशांत अंकिता सोबत बोलत असे ही गोष्ट रिया चक्रवर्तीला खटकत असे. सुशांतला डिप्रेशनचा त्रास होता हे त्याने अंकिताला कधीच सांगितले नव्हते, असे अंकिता लोखंडेने बिहार पोलिसांना सांगितलं आहे.

जेव्हा सुशांत आणि अंकिता यांच्य्मध्ये शेवटचं बोलणं झालं होतं तेव्हा सुशांतने बिहार मधील १०० मुलांना दत्तक घेऊन त्यांचा शिक्षणाचा खर्च उचलण्याची इच्छा व्यक्त केली होती. जवळपास ५० मिनिटे झालेल्या विचारपूस मधून ही माहिती बाहेर आली आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : अंकुश ढावर‌ॆ.

error: Content is protected !!
Exit mobile version