गोल पोस्ट आरोग्य अंकिता पाटील यांच्या हस्ते डॉक्टरांना पीपीई किट, मास्क, ऑक्सिमीटर, इन्फ्रारेड थर्मामीटरचे वाटप

अंकिता पाटील यांच्या हस्ते डॉक्टरांना पीपीई किट, मास्क, ऑक्सिमीटर, इन्फ्रारेड थर्मामीटरचे वाटप

इंदापूर, दि. १० सप्टेंबर २०२०: सध्या कोरोनाची परिस्थिती भयंकर होत चालली आहे. कम्युनिटी स्प्रेड (समुदाय प्रसार) च्या माध्यमातून अनेक जण कोरोना बाधित होत आहेत. या कोरोना बाधित रुग्णांना किंवा संशयित रुग्णांना उपचार करते वेळी डॉक्टर्स -आरोग्य कर्मचारी आपल्या जिवाची पर्वा न करता कार्य करत आहेत.

डॉक्टर्स – आरोग्य कर्मचारी यांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून लागणारे साहित्य कु. अंकिता हर्षवर्धनजी पाटील यांच्या जिल्हा परिषदेच्या कोविड कॅश कार्ड अंतर्गत तीन लाख रूपये रकमेचे पीपीई किट, मास्क, ऑक्सिमीटर, इन्फ्रारेड थर्मामीटर व इतर साहित्याचे वाटप पुणे जिल्हा परिषद सदस्या कु.अंकिता हर्षवर्धनजी पाटील यांच्या हस्ते बावडा येथे बावडा आरोग्य केंद्र व सर्व उपकेंद्रातील सर्व डॉक्टर्स व आरोग्य कर्मचारी यांना केले.

यावेळी बावडाचे सरपंच किरण पाटील, बावडा आरोग्य केंद्राचे  वैद्यकीय अधिकारी अधिकारी डॉ. कपिलकुमार वाघमारे, डॉ. स्नेहल पवार, डॉ. पानबुडे, डॉ. निकिता घोगरे, डॉ. वैशाली खाडे, डॉ. सुमति ढोले व इतर यावेळी उपस्थित होते.

न्यूज अनकट प्रतिनिधी- निखिल कणसे

error: Content is protected !!
Exit mobile version