अण्णा हजारे यांचे मौन व्रत आंदोलन सुरू

23

नगर : निर्भयाच्या मारेकऱ्यांना जोपर्यत फाशी होत नाही. तोपर्यंत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी राळेगणसिद्धी येथे मौन व्रत आजपासून आंदोलन सुरू केले आहे.

संपूर्ण देशाला हादरवून सोडणाऱ्या निर्भया प्रकरणातील दोषी पवन कुमार गुप्ता याची अल्पवयीन असल्याची याचिका न्यायालयाने फेटाळून लावली आहे.

निर्भया प्रकरण घडलं तेव्हा आपण अल्पवयीन होतो, असा दावा पवन कुमारने केला होता. मात्र, त्याची ही याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. इतकेच नव्हे, तर पवनचे वकील ए. पी. सिंग यांना कोर्टाची दिशाभूल केल्याप्रकरणी २५ हजारांचा दंडही ठोठावला आहे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा