अण्णा, उठा उठा सत्ता गेली आंदोलनाची वेळ आली…!

27

मुंबई : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आंदोलनासाठी प्रसिद्ध आहेत. मात्र ते भाजपाविरोधी आंदोलन करत नाही, असा आरोप त्यांच्यावर अधून मधून होत असतो. आता राज्यात सत्तेची समीकरणे बदलत आहेत.
बदललेल्या सत्ता समीकरणानुसार राष्ट्रवादी शिवसेना आणि काँग्रेस हे आता सत्तेत बसणार आहे. तर भाजपला मात्र विरोधी पक्षात बसावे लागणार आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी अण्णा हजारे यांना टोला लगावला आहे.
अण्णा, उठा उठा सत्ता गेली आंदोलनाची वेळ आली, असे ट्वीट करत जितेंद्र आव्हाड यांनी अण्णा हजारे यांच्यावर निशाणा साधला आहे. त्यांनी अण्णा हजारे यांचा झोपलेला म्हणजे आराम करत असतानाचा फोटो ट्वीट करत त्यांना बदललेल्या सत्ता समीकरणानुसार आंदोलन करण्याची वेळ आलीये, असं सांगत टोला लगावला आहे.
अण्णा उठा कामाला लागावं लागेल… रामदेव बाबा तयार आहेत, असंही त्यांनी आपल्या ट्वीटमधून म्हटले आहे.
दिल्लीतील सत्ता स्थापनेसंबंधीच्या बैठका संपन्न झाल्या आहेत. त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी त्यांच्या मित्रपक्षांसोबत चर्चा होणार आहे. नंतर शिवसेनेसोबत ते चर्चा करणार आहेत. तर दुसरीकडे शिवसेनेनेदेखील आपल्या सर्व आमदारांची बैठक बोलावली आहे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा