मुंबई: करोनावर प्रतिबंधक उपाय म्हणून मास्क, सॅनिटाइर्झ आणि हॅण्डवॉशचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. मागणी वाढल्याने दुकानांमध्ये त्याचा तुटवडा निर्माण झाल्याचा फायदा काही बोगस उत्पादकांनी घेतला असून बनावट सॅनिटायझरची विक्री सुरू केली आहे. अन्न व औषध प्रशासनाने बनावट सॅनिटाइझर मुंबईतून जप्त केले आहे.
अश्या प्रकारच्या सॅनिटाइझर मध्ये कोणत्याही प्रकारचे अँटी बायोटिक तत्व कीव अँटी बॅक्टरिया तत्व नसल्याने याचा कोणताही प्रभाव vishanunvr पडत नाही. दुकानांमधून सॅनिटाइझर चा पडलेला तुटवडा भरून काढण्यासाठी व फायदा करण्यासाठी अश्या प्रकारचे बनावे सॅनिटाइझर बाजारात विक्रीस येत आहेत. अश्या प्रकारच्या प्रॉडक्ट वर अन्न व औषध प्रशासनाने मोठ्या प्रमाणावर जप्ती केली आहे.
बाजारात ब्रँडेड सर्वज्ञात कंपन्यांचे सॅनिटाइझर घ्यावेत जेणे करून फसवणुकीपासून आपण दूर राहाल. याच बरोबर सध्या दुकानदार ही उत्पादने एमआरपी पेक्षा ही जास्त किमतीने विकत आहेत. याची देखील ग्राहकांनी तपासणी केली पाहिजे. शक्य झाल्यास आपले हात हेंड वोष ने २० सेकंद धुतले तरी चालतील.