जालना, दि,१० मे २०२३ -: जालना नगरपालिकेचे रुपांतर आता महापालिकेत होणार असून राज्यसरकार कडून त्याबाबतची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे जालना ही आता राज्यातील २९ वी महानगरपालिका म्हणून घोषित करण्यात आली आहे. राज्य सरकारने तसे आदेश काढले असून याबाबत नगरविकास विभागाच्या उपसचिवांनी अधिसूचना जारी केली आहे.
मागील काही दिवसांपासून जालना नगरपालिकेचे रुपांतर महानगरपालिकेत करण्यासंदर्भात राजकीय हालचाली सुरू झाल्या होत्या. यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून प्रस्ताव मागवण्यात आला होता. त्यामुळे हा निर्णय शासनाच्या विचाराधीन होता. यासाठी सूचना आणि हरकती देखील मागवण्यात आल्या होत्या. आज अखेर सरकारने जालना नगरपालिकेचे रुपांतर महापालिकेत करण्याचे आदेश काढले आहे.
राज्य सरकार कडून जालना महानगरपालिकेची घोषणा करण्यात आली आहे. जालना जिल्ह्याची स्टील इंडस्ट्रीज म्हणून ओळख आहे. तर मोसंबी उत्पादक जिल्हा म्हणून देखील जालना शहराची राज्यभरात ओळख आहे. शहराची वाढती लोकसंख्या विचारात घेता आणि शहराच्या विकासाच्या दृष्टीने जालना महानगरपालिका घोषित करावी अशी अनेक वर्षा पासून मागणी सुरू होती. दरम्यान आता राज्य सरकारच्या घोषणेमुळे या पाठपुराव्याला मोठं यश आलं आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी – अनिल खळदकर