संयुक्त किसान मोर्चाची घोषणा – १८ फेब्रुवारी रोजी रेल्वे रोको आंदोलन

नवी दिल्ली, ११ फेब्रुवरी २०२१: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत आंदोलन संपवण्याच्या आवाहना नंतर आता शेतकरी त्यांच्या आंदोलनाची व्याप्ती वाढविण्याच्या तयारीत आहेत. शेतकरी संघटना युनायटेड किसान मोर्चाने बुधवारी जाहीर केले की १८ फेब्रुवारी रोजी देशात ४ तास रेल्वे रोको आंदोलन करण्यात येईल.

युनायटेड किसान मोर्चाच्या शेतकरी संघटनेचे नेते डॉ. दर्शन पाल यांनी प्रसिद्धीस दिलेल्या प्रेस नोटमध्ये पुढील आठवड्याभरातील कार्यक्रमाचे सविस्तर वर्णन देण्यात आले. मोर्चा ने सांगितले की, संयुक्त किसान मोर्चाच्या आजच्या बैठकीत आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी येत्या काही दिवसांच्या योजनेचा खुलासाही करण्यात आला आहे.

४ तास रेल्वे रोको आंदोलन

संयुक्त किसान मोर्चाने सांगितले की, १२ फेब्रुवारीपासून राजस्थानातील सर्व रस्ते टोल प्लाझा देखील टोलमुक्त केले जातील. यानंतर, १४ मार्च रोजी पुलवामा हल्ल्यात शहीद सैनिकांच्या बलिदानाची आठवण म्हणून मेणबत्ती मार्च, मशाल मिरवणूक आणि इतर कार्यक्रम आयोजित केले जातील.

मोर्चा ने सांगितले की, १६ फेब्रुवारी रोजी सर छोटूराम यांच्या जयंती दिवशी शेतकरी देशभर एकता दर्शवतील. मात्र, मोर्चा कडून १८ फेब्रुवारीच्या दिवशी देशभरात रेल्वे रोको आंदोलन करणार असल्याचे बोलले जात आहे. किसान मोर्चाने सांगितले की १८ फेब्रुवारी रोजी देशभरात दुपारी १२ ते ४ या वेळेत रेल्वे रोको कार्यक्रम घेण्यात येईल.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा