गोल पोस्ट क्रीडा क्रिकेट ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी ‘टीम इंडिया’ची घोषणा, युवा खेळाडूंना संधी

ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी ‘टीम इंडिया’ची घोषणा, युवा खेळाडूंना संधी

मुंबई, २७ ऑक्टोबर २०२०: विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय क्रिकेट संघांच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याला तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेसह प्रारंभ होणार आहे. १० नोव्हेंबरला आयपीएल फायनल झाल्यानंतर १४ नोव्हेंबपर्यंत भारताचे खेळाडू ऑस्ट्रेलियात दाखल होणार आहेत. या दौऱ्यात टीम इंडिया ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडे, टेस्ट आणि टी २० मालिका खेळणार आहे. आयपीएलमध्ये दमदार कामगिरी करणाऱ्या युवा खेळाडूंना त्यांच्या मेहनतीचं फळ मिळालं आहे. नव्या चेहऱ्यांना टीम इंडियाकडून ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी संधी देण्यात आली आहे.

या दौऱ्यात भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरूद्ध ३ एकदिवसीय, ४ कसोटी आणि तीन टी२० सामन्यांची मालिका खेळणार आहे. या दौऱ्यासाठी मुंबईचा ‘हिटमॅन’ रोहित शर्माला संघात स्थान देण्यात आलेले नाही, पण आयपीएलमध्ये भरीव कामगिरी करणाऱ्या अनेक नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. या युवा खेळाडूंमध्ये शुभमन गिल, वरुण चक्रवर्ती आणि नवदीप सैनी या खेळाडूंना संधी मिळाली आहे.

टीम इंडिया टी२० संघ

विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, मयंक अग्रवाल, लोकेश राहुल (उपकर्णधार आणि यष्टीरक्षक), श्रेयस अय्यर, मनीष पांडे, हार्दिक पांड्या, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), रवींद्र जाडेजा, वॉशिंग्टन सुंदर, युजवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, नवदीप सैनी, दीपक चहर, वरुण चक्रवर्ती

टीम इंडिया कसोटी संघ

विराट कोहली (कर्णधार), मयंक अग्रवाल, पृथ्वी शॉ, केएल राहुल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), हनुमा विहारी, शुभमन गिल, वृद्धिमान साहा (यष्टीरक्षक), ऋषभ पंत (यष्टीरक्षक), जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, उमेश यादव, नवदीप सैनी, कुलदीप यादव, रवींद्र जाडेजा, रविचंद्रन अश्विन, मोहम्मद सिराज

टीम इंडिया एकदिवसीय संघ

विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, शुभमन गिल, केएल राहुल (उपकर्णधार आणि यष्टीरक्षक), श्रेयस अय्यर, मनीष पांडे, हार्दिक पांड्या, मयंक अग्रवाल, रवींद्र जडेजा, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, नवदीप सैनी, शार्दुल ठाकूर

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

error: Content is protected !!
Exit mobile version