पुणे, १० डिसेंबर २०२०: मराठी सिनेसृष्टी ला एकापाठोपाठ एक असे मोठे धक्के बसले आहेत. नुकतेच मराठी सिनेसृष्टीतल दिग्गज आभिनेते रवी पटवर्धन यांचे निधन झालं होतं तर या दुखातुन मराठी सिनेसृष्टी सावरत आसतानाच आपल्या शास्त्रीय संगीतात मनमोहक सुरेख गुंफण करणारे प्रसिद्ध संगीतकार नरेंद्र भिडे यांचे ह्रदय विकाराच्या झटकाने निधन झाले.
नरेंद्र भिडे यांचे १० डिसेंबर रोजी पहाटे हृदयविकाराच्या धक्क्यानं निधन झालं. त्यांचं पार्थिव सकाळी ९ वाजून ३० मिनिटाला अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. तर पुढे ११ वाजता वैकुंठधाम येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. नरेंद्र भिडे यांनी आपल्या या कलेला अंतरराष्ट्रीय स्तरावर देखील पोहचवले होतं.
त्यांनी संगीतबद्ध केलेल्या काही खास कलाकृती….
अवंतिका, ऊन पाऊस, कितीतरी दिवसांनी आज, त्या पैलतिरावर मिळेल मजला, नुपूर, श्रावणसरी ही त्यांची आठवणीतील गाणी गाजली. तर देऊळबंद, पुष्पक विमान, चि सौ कां, अनुमती, पाऊलवाट आणि रानभूल या चित्रपटांना त्यांनी संगीतबद्ध केलं होतं. त्यांच्या मनातच २४ तास गाणं चालायचे तर ते ते नेहमी म्हणत गाण्याकडे बघण्याचा दृष्टिकोन हा नेहमी त्या कलेचा आसवा.
न्यूज अनकट प्रतिनिधी: निखिल जाधव