पुरंदर मध्ये बनावट सरकारी आदेशाचं आणखी एक प्रकरण उघडकीस…

पुरंदर, २४ नोव्हेंबर २०२०: पुरंदर तालुक्यात सध्या बनावट सरकारी कागदपत्रं बनवल्याची आनेक प्रकरणं समोर येत आहेत.
यापूर्वी पुरंदरच्या तहसीलदार रूपाली सरनोबत यांनी याबाबत तक्रार दिली होती. आता यानंतर प्रांत कार्यालयातील नायब तहसीलदार पदावरील अधिकाऱ्यानं अश्याच प्रकारची तक्रार सासवड पोलीस स्टेशन मध्ये दिली आहे. यासंदर्भात पोलिसांनी भारतीय दंड विधान कलम ४६५, ४६६, ४६७ नुसार गुन्हा दाखल केलाय.

याबाबत सासवड पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पुरंदर दौंडच्या प्रांत अधिकारी कार्यालयात उत्खननात पूर्वी परवानगी न घेतल्यानं पेनल्टी भरण्या संदर्भात दिलेला आदेश आढळून आला असून तो आदेश प्रांत कार्यालयानं सादर केला नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. या संदर्भात प्रांत कार्यालयातील नायब तहसीलदार सुहास रणेश सोमा यांनी तक्रार दिलीय.

याबाबत दिलेल्या तक्रारीत त्यांनी म्हटलं की, दिनांक ९ नोव्हेंबर २०२० रोजी टपाला द्वारे दोन लिफापे प्रांत कार्यालयास प्राप्त झाले. अव्वल कारकून यांनी ते वाचून याबाबतची माहिती प्रांत अधिकाऱ्यांना दिली व अशा प्रकारचे आदेश आपल्या कार्यालयाकडून दिले जात नाहीत याबाबतची कल्पना दिली. या नोटीस मध्ये कल्पना विश्वजीत जोशी व मानवी विश्वजीत जोशी राहणार पुणे यांना उत्खनना पुर्वी परवानगी न घेतल्यानं दंड भरण्या संदर्भात विषय असुन. त्यावर प्रांत अधिकारी यांची स्कॅन केलेली स्वाक्षरी व शिक्का आढळून आले आहेत. मात्र, कार्यालयातील आवक जवक रजिस्टर पाहिलं असता अशा प्रकारची कोणतीही नोटीस या कार्यालयातून देण्यात आल्याचं दिसून आलं नाही.

संबंधित नोटीसा या कार्यालयातून देण्यात आल्या नसल्याचं तक्रारीत म्हटलं आहे. तसंच गौण खनिज उत्खनन बाबत कोणतेही आदेश या कार्यालयातून काढले जात नाहीत असं त्यांनी तक्रारीत म्हटलं आहे. हा आदेश खोटा असून त्यावर उपविभागीय अधिकाऱ्याची सही व मोहर उठवली आहे. या संदर्भात त्यांनी अज्ञात व्यक्ती विरोधात तक्रार दिली आहे. या घटनेचा तपास ससावड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आण्णासाहेब घोलप करीत आहेत.

न्यूज अनकट प्रतीनिधी: राहुल शिंदे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा