देशात कोरोनाचा आणखी एक बळी, संख्या १२ वर

16

अहमदाबाद: देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून देशातील मृतांची संख्यातही वाढ झाली आहे. गुजरातमध्ये आज कोरोनाग्रस्त महिलेचा मृत्यु झाला. गुजरातच्या सूरतमध्ये एका ६९ वर्षीय व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. याशिवाय बडोद्याच्या एका रुग्णालयात ६५ वर्षांच्या महिलेचा मृत्यू झाला. मात्र या महिलेच्या कोरोना चाचणीचा अहवाल अद्याप आलेला नाही. देशातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ६०० पेक्षा जास्त झाली असून मृतांचा आकडा १२ वर पोहोचला आहे. डेक्कन हेराल्ड या वेब पोर्टलने याबाबतचे वृत्त दिले आहे.

अलिकडेच विदेशात जाऊन आलेल्या एका ८५ वर्षीय महिलेचा करोनाने बळी घेतलाय. त्यांना अहमदाबादच्या जिल्हा रुग्णालयात २२ मार्चला दाखल करण्यात आलं होतं. करोनाची लागण होण्यापूर्वी या महिलेला आधीपासून बरेच आजार होते, अशी माहिती गुजरातच्या आरोग्य विभागाने दिलीय. दरम्यान, गुजरात आरोग्य विभागानं दिलेल्या माहितीनुसार, सूरतमध्ये कोरोनामुळे मृत पावलेल्या ज्येष्ठ नागरिकाला अनेक गंभीर आजार होते. याशिवाय बडोद्याच्या रुग्णालयात मृत पावलेली महिलादेखील अनेक गंभीर आजारांचा सामना करत होती. गुजरातमध्ये कोरोनामुळे पहिल्या मृत्यूची नोंद झाली होती. त्यावेळी, देशभरातील कोरोनाच्या मृतांचा आकडा सातवर पोहोचला होता. आता गुजरातमध्ये दुसऱ्या कोरोना मृत्युची नोंद झाली असून देशातील मृतांचा आकडा १३२वर पोहोचला आहे.

गुजरातमध्ये करोनाचे ३९ रुग्ण आढळले आहेत. यापैकी दोघांचा मृत्यू झाला आहे. दुसरीकडे देशात बुधवारी करोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या ६५९ वर गेली आहे. यापैकी ४३ जण बरे झाले आहेत. तर १२ जणांचा मृत्यू झाला आहे. करोना व्हायरसने बुधवारी मध्य प्रदेश आणि तामिळनाडू एक-एक बळी घेतला. दोन्ही राज्यांत करोनामुळे प्रथमच रुग्णाचा मृत्यू झाला आहे. मध्य प्रदेशात इंदूरमध्ये ६५ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. ही माहिला उज्जैनची आहे. ती अलिकडेच विदेशात परतली होती, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा